शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्येचा तपास ‘सीबीआय’कडे देणार

By admin | Updated: June 23, 2016 04:55 IST

ज्येष्ठ नेते गोंविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास ‘सीबीआय’कडे देण्यास राज्य शासनाची हरकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्राद्वारे स्पष्ट केले

विश्वास पाटील,  कोल्हापूरज्येष्ठ नेते गोंविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास ‘सीबीआय’कडे देण्यास राज्य शासनाची हरकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्राद्वारे स्पष्ट केले. त्यांच्या वतीने प्रधान सचिव (विशेष) रजनीश सेठ यांनी हे पत्र श्रीमती उमा व मेघा पानसरे यांना पाठविले आहे. गेल्याच आठवड्यात पानसरे कुटुंबीयांनी येथे पत्रकार परिषद घेऊन तशी मागणी केली होती. तिची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. प्रधान सचिव सेठ यांनी आपण हे पत्र मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने पाठवीत असल्याचे म्हटले आहे. ही चौकशी ‘सीबीआय’मार्फत करण्यास आमची हरकत नसल्याचे शासनाला कळवावे, असे त्यांनी पानसरे कुटुंबीयांना सुचविले आहे. दाभोलकर व पानसरे यांच्या हत्यांत बरीच साम्यस्थळे आहेत. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय करीत आहे. त्यामुळे पानसरे हत्येचा तपासही ‘सीबीआय’कडे गेल्याने तपासात एकसूत्रता राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.पानसरे यांचा कोल्हापुरात मॉर्निंग वॉकला गेल्यावर २० फेब्रुवारी २०१५ रोजी खून झाला. या हत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक संजय कुमार यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सुरू आहे. या पथकाने सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याला १३ सप्टेंबर २०१५ रोजी अटक केली. गायकवाड कोठडीत आहे. त्याच्याविरुद्ध १४ डिसेंबर २०१५ ला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक सहा यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. योगायोग असाही...पानसरे हत्येचा तपास ‘एसआयटी’मार्फत करण्यात यावा, अशी मागणी मेघा पानसरे यांनी केली व त्यासाठी न्यायालयात जाणार म्हटल्यावर राज्य सरकारने त्याच्या आधीच ‘एसआयटी’ची नियुक्ती केली. आताही पानसरे-दाभोलकर हत्येप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेची गुरुवारी सुनावणी आहे. त्यावेळी हा तपास ‘सीबीआय’कडे सोपवावा, अशी मागणी करण्यात येणार होती. न्यायालयही तसा आदेश देऊ शकते, असा विचार करून मुख्यमंत्र्यांनी त्या अगोदरच ‘सीबीआय’कडे हा तपास सोपविण्याचा निर्णय घेतला. भाजप सरकारकडे कुणी बोट दाखवू म्हणून ही तत्परता दाखविली असल्याची चर्चा आहे.