पंकजांनी घेतली भुजबळ यांची भेट

By Admin | Updated: September 22, 2016 07:18 IST2016-09-22T07:18:10+5:302016-09-22T07:18:10+5:30

पाच दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही.

Pankaj gifted Bhujbal a gift | पंकजांनी घेतली भुजबळ यांची भेट

पंकजांनी घेतली भुजबळ यांची भेट


मुंबई : पाच दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. त्यांच्या नाडीचा वेग मंदावला असून, सांध्यांची सूज अजूनही कमी झालेली नाही. बुधवारी महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन भुजबळ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
भुजबळ यांना ताप आल्यामुळे शनिवारी त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी पंकजा मुंडे यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. ‘पहिल्यापासून आमचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे त्यांची भेट घेतली,’ असे पंकजा यांनी सांगितले.
जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजबळ यांच्या नाडीचा वेग मंदावला आहे. ठोके ५० वर आले आहेत. सांध्याची सूज कमी झालेली नाही. त्यांच्यावर औषधोपचारही सुरू आहेत. ताप कमी झाला
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pankaj gifted Bhujbal a gift