शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

पाचपुते यांना अपशब्द वापरले नाहीत

By admin | Updated: August 16, 2014 02:10 IST

पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर नाराजी व्यक्त करत आ़ बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला़

अहमदनगर : पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर नाराजी व्यक्त करत आ़ बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला़ पाचपुते यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून त्यांच्याविषयी आपण एकही अपशब्द वापरला नसल्याचे पिचड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले़नगर येथील पोलीस मैदानावर पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ पिचड म्हणाले, माझे सहकारी बबनराव पाचपुते यांनी दूरध्वनीवरून शिव्या दिल्याचा आरोप केलेला आहे़ या आरोपात काहीही तथ्य नाही़ मी पाचपुते यांना फोन केला नाही़ त्यांनी फोन केला असता मी त्यांना विचारले की, आपण धनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा दिला असल्याचे वर्तमानपत्रातून समजले़ आपणही अदिवासी खात्याचे मंत्री राहिलेले आहात़ त्यामुळे आपल्याला आदिवासींच्या जीवनाची सर्व माहिती असताना तुम्ही हा पाठिंबा कसा काय दिला? तुम्ही हा पाठिंबा देऊन आदिवासी जनतेची घोर प्रतारणा केली, असे तुम्हाला वाटत नाही का? हे मी त्यांना दूरध्वनीवरून बोललो़ कारण आदिवासी जमातीतील माणसं सुसंस्कृत आहेत़ खोटे बोलणे, चोरी करणे, ही आदिवासी जमातीची वैशिष्ट्ये नाहीत, असे पिचड यांनी या वेळी सांगितले.धनगर समाजास पाचपुते पाठिंबा देतात़ मात्र आदिवासी समाजाची कोणतीही वैशिष्ट्ये धनगर समाज पूर्ण करू शकत नाही़ त्यामुळे धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करता येणार नाही, असे पाचपुते यांनी आ़ प्रकाश शेंडगे, भाऊसाहेब वाघचौरे, भावना गवळी, सुधीर मुनगंटीवार, हंसराज आहिर, प्रतापराव जाधव, प्रतापराव सोनवणे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे़ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आपले पांडुरंग आहेत, असे सांगणारे पाचपुते उपेक्षित कसे, असा सवालही पिचड यांनी या वेळी उपस्थित केला़ (प्रतिनिधी)