शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

ओवींसी पुण्यात सभा होणार?

By admin | Updated: February 4, 2015 02:23 IST

आॅल इंडिया मजलिस-ए इत्तिहादूल मुस्लिमीनचे (ए.आय.एम.आय.एम) संघटनेचे अध्यक्ष व खासदार असदुुद्दीन ओवैसी यांच्या गोळीबार मैदानातील सभेला पोलिसांनीही या सभेला परवानगी नाकारली होती.

पुणे : आॅल इंडिया मजलिस-ए इत्तिहादूल मुस्लिमीनचे (ए.आय.एम.आय.एम) संघटनेचे अध्यक्ष व खासदार असदुुद्दीन ओवैसी यांच्या गोळीबार मैदानातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांची नियोजित सभा कोंढव्यातील कौसरबाग मंगल कार्यालयामध्ये उद्या (बुधवार) सायंकाळी ५ वाजता घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. त्याबाबत पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली असून पोलिसांनी अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. उद्या दुपारपर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.मूलनिवासी मुस्लिम मंच, अ‍ॅक्शन कमिटी यांच्या वतीने माजी न्यायमूर्र्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले, या परिषदेला ओवैसींना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. मात्र शिवसेनेने या कार्यक्रमात ओवैसीनी चिथावणीखोर भाषण केल्यास ही सभा उधळून लावू, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. कॅन्टोमेंट बोर्डाने गोळीबार मैदान हे केवळ व्यावसायिक व विवाह समारंभासाठी दिले जात असल्याचे स्पष्ट करून आयोजकांना मैदानाचे ताबापत्र दिले नव्हते. त्यानंतर पोलिसांनीही या सभेला परवानगी नाकारली होती. या पार्श्वभूमीवर आयोजकांनी मंगळवारी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांची भेट घेतली. बंद सभागृहामध्ये सभा घेण्याची त्यांनी पोलिसांकडे तयारी दर्शविली आहे. त्यानुसार सभेसाठी कोंढव्यातील कौसरबाग मंगल कार्यालयाचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. त्याकरिता परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज करण्यात आल्याची माहिती मुलनिवासी मुस्लिम मंच संघटनेचे पदाधिकारी अंजूम इनामदार यांनी दिली. (प्रतिनिधी)आता एमआयएमचे ‘टार्गेट’ संघभूमी!नागपूर : विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे दोन जागांवर विजय मिळविणाऱ्या आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलिमिनने (एमआयएम) राज्यात संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय तसेच मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव पुण्यातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर नागपुरातही पोलिसांच्या परवानगीवरच या सभेचे भवितव्य ठरणार आहे़