Our MLAs will not go anywhere, we are bringing them: Chandrakant Patil | आमचे आमदार कुठेही जाणार नाही, आम्हीच त्यांचे आणणार आहोत : चंद्रकांत पाटील 

आमचे आमदार कुठेही जाणार नाही, आम्हीच त्यांचे आणणार आहोत : चंद्रकांत पाटील 

ठळक मुद्देभाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत बैठक

पुणे : महाविकास आघाडी सरकार आमच्यासोबत इतकी खुन्नस काढते आहे कि छोटी छोटी कामे देखील केली जात नाही. त्यामुळे आपल्या मतदार संघातील प्रश्न घेऊन जर कुणी आमदारशरद पवार यांना भेटले असेल त्यात गैर काय आहे.परंतु, या भेटीनंतर ते आमदार थेट भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वातावरण मुद्दामहून महाविकास आघाडीचे काही नेते निर्माण करत आहे. मात्र ,कुणी भाजप आमदार शरद पवार यांच्या संपर्कात नाही. तसेच आमचे कुणीही आमदार कुठेही जाणार नाही पण आम्हीच त्यांचे आणणार आहोत, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.

पुण्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत कोरोनाच्या धर्तीवर बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, साताऱ्यातील भेटीचे उदाहरण देऊन काही नेते भाजपाचे आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास उत्सुक आहेत असे सांगत आहे. मात्र; काही कामानिमित्त सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांमध्ये वेळोवेळी भेटीगाठी घडत असतात.त्यामुळे आपल्या मतदारसंघातील समस्या घेऊन जर कुणी शरद पवारांना भेटले असेल तर त्याचा अर्थ ते त्यांच्या संपर्कात आहे असा होत नाही. मात्र, वेळप्रसंगी राजकारणात या प्रकारच्या चर्चा अनेकवेळा मुद्दामुहून घडवून आणल्या जातात. त्याच धर्तीवर महाविकास आघाडीतले नेते भाजप सोडून काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वातावरण निर्माण करत आहे.परंतु, भाजपचा कोणताही आमदार पवार यांच्या संपर्कात नाही. मात्र या भेटीचा राजकीय फायदा उचलत महाविकास आघाडी आणि शरद पवार हे त्यांच्या आमदारांना दिलासा आणि विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Our MLAs will not go anywhere, we are bringing them: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.