शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींची संत्री जमिनीवर

By admin | Updated: August 16, 2014 02:09 IST

तालुक्यात सर्वाधिक उत्पन्न देणारे पीक म्हणजे संत्रा. दरवर्षी संत्रा उत्पादनातून सुमारे ७०० कोटींची उलाढाल होते. गेल्या मृगात पाऊस नसल्यामुळे मृगबहार फुटलाच नाही

चांदूरबाजार (अमरावती) , -तालुक्यात सर्वाधिक उत्पन्न देणारे पीक म्हणजे संत्रा. दरवर्षी संत्रा उत्पादनातून सुमारे ७०० कोटींची उलाढाल होते. गेल्या मृगात पाऊस नसल्यामुळे मृगबहार फुटलाच नाही, तर यंदा आंबिया बहराची फळे झाडावरच पिवळी होऊन जमिनीवर गळत आहेत. या अज्ञात रोगाने ग्रासलेल्या संत्रा फळांमुळे संत्रा उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. चांदूरबाजार तालुक्यात १० हजार ३०६ हेक्टर क्षेत्रात संत्रा झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यात २८ लाख ५४ हजार ७६२ झाडे आहेत तर उत्पादन देणारी संत्रा झाडे ८ हजार ९४३ हेक्टरमध्ये आहे. यात २४ लाख ७७ हजार २११ झाडावर संत्रा उत्पादक आंबिया व मृग बहाराची फळे घेतात. यात सर्वाधिक उत्पादन आंबिया बहाराच्या फळापासून होते. यंदा कधी नव्हे इतका समाधानकारक आंबिया बहाराची फळे झाडावर होती. त्यामुळे संत्रा उत्पादक उत्साहित होते. इतर वेळी संत्रा फळांची गळण सर्वसाधारण होती. आधी या फळाला झाडावरच तडा जाऊन ते फळ जमिनीवर येत होते. आता ही फळे झाडावरच टिकविण्यासाठी काय उपाययोजना करावी, असा प्रश्न पडला आहे. याबाबत कृषी विभाग व कृषी शास्त्रज्ञसुद्धा शेतकऱ्यांचे समाधान करू शकले नाहीत. या संत्रा गळतीचा परिणाम सर्वाधिक चांदूरबाजार तालुक्यात झाला आहे. तालुक्यात सर्वाधिक संत्राक्षेत्र शिरजगाव कसबा परिसरात आहे. त्यात गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत काही संत्रा उत्पादकांनी या गळतीची कारणमीमांसा कृषी तज्ज्ञांपासून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘कॉकबेन’ या रोगाने संत्रा फळांना ग्रासल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यावर उपाय सांगितला नाही. जी फवारणी करण्याचा सल्ला काही कृषी तज्ज्ञांनी दिला त्याचा वापर काही संत्रा उत्पादकांनी याआधीच केला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे आता संत्रा उत्पादकांनी आपल्या बागेतच जाणे थांबविले आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन संत्रा उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची मागणी शिरजगाव कसबा येथील संत्रा उत्पादक संघ व विदर्भ संत्रा उत्पादक संघाने केली आहे.