शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅर्गनायझर’वरून विरोधकांनी केला सभात्याग!

By admin | Updated: March 14, 2015 05:01 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘साप्ताहिक आॅर्गनायझर’मध्ये छापण्यात आलेल्या वादग्रस्त भारतीय नकाशावरून विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले.

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘साप्ताहिक आॅर्गनायझर’मध्ये छापण्यात आलेल्या वादग्रस्त भारतीय नकाशावरून विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. या विषयावर केलेली चर्चेची मागणी फेटाळण्यात आल्यामुळे संतप्त विरोधकांनी सभात्याग केला. रा. स्व. संघाच्या मुखपत्रात छापण्यात आलेल्या भारतीय नकाशातून काश्मीरचा भूभाग पाकिस्तानमध्ये दाखविण्यात आला होता. यावर नियम २८९ अन्वये लोकभारतीच्या कपिल पाटील यांनी चर्चेची मागणी केली. रा. स्व. संघाच्या या मुखपत्रात काश्मीरचा भाग पाकिस्तानला बहाल करण्यात आला आहे. हा देशाच्या सार्वभौमत्वावरचा घाला असून, सरकारने याबाबत आपली भूमिका मांडावी, अशी मागणी पाटील यांनी केली. तर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माणिकराव ठाकरे, हेमंत टकले यांनीही चर्चेची मागणी केली. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सरकारची बाजू मांडली. नजरचुकीने हा नकाशा छापण्यात आला असला तरी ती चूक अक्षम्य आहे. यापुढे असा प्रकार घडणार नाही, असे सांगत आॅर्गनायझरच्या संपादकांनी या प्रकरणावर आधीच माफी मागितली आहे. चुकीचा नकाशा त्यांनी संकेतस्थळावरून काढूनही टाकला; शिवाय या प्रकरणाचा सरकारशी अथवा राज्याशी संबंध नाही, असे बापट यांनी सांगितले. यानंतर पिठासीन अधिकाऱ्यांनी सरकारला अधिक माहिती घेऊन सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश देत चर्चेची मागणी फेटाळली. त्यामुळे विरोधकांनी संघाविरोधात घोषणा देत सभात्याग केला. (प्रतिनिधी)