शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कागदांवरील संस्था प्रत्यक्षात उभारणार

By admin | Updated: December 25, 2014 00:24 IST

गेल्या दोन वर्षांत उपराजधानीत दर्जेदार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या घोषणा झाल्या आहेत. काही ना काही अडचणींमुळे या अद्याप कागदावरच असल्या तरी यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे

विनोद तावडे : नागपुरात शैक्षणिक ‘हब’ होण्याची क्षमतायोगेश पांडे - नागपूरगेल्या दोन वर्षांत उपराजधानीत दर्जेदार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या घोषणा झाल्या आहेत. काही ना काही अडचणींमुळे या अद्याप कागदावरच असल्या तरी यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येतील. जागा तसेच निधीअभावी कुठल्याही संस्थेची स्थापना अडणार नाही याची दक्षता घेऊ, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले. राज्यातील पहिल्या ‘आयआयएम’साठी नागपूरचे नाव केंद्राकडे पाठविण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केल्यानंतर, तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.मध्य भारतातील शैक्षणिक केंद्र म्हणून नागपूरने स्वत:ची ओळख प्रस्थापित केली आहे. गेल्या दोन वर्षांत नागपूरसाठी ‘ट्रिपल आयटी’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी या संस्थांना मंजुरी मिळाली. परंतु घोषणा होऊनदेखील वरील तीनपैकी एकही संस्था प्रत्यक्षात सुरू झालेली नाही. सर्व शिक्षण संस्था या अजूनही कागदपत्रांतच अडकल्या आहेत.‘ट्रिपल आयटी’ची गाडी जागेवरून अडली आहे. वर्धा मार्गावरीलच मौजा वारंगा येथील १०० एकरच्या जागेला अद्याप केंद्राची हिरवी झेंडी मिळालेली नाही. ‘महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी’च्या जागेलादेखील राज्य शासनाची मंजुरी मिळालेली नाही. तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘आॅटोमोटिव्ह’चौकाजवळील मौजा वांजरी येथील ७.४७ जागा अद्याप शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या ताब्यात आलेली नाही.यासंदर्भात तावडे यांना विचारणा केली असता, वरील सर्व अडचणींचा अभ्यास करण्यात येत असून, लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरू होण्याकरिता आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जागेसाठी निधीची कमतरता येणार नाही. अधिवेशन आटोपल्यामुळे आता या बाबींकडे प्रामुख्याने लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरमध्ये निश्चितच शैक्षणिक ‘हब’ होण्याची क्षमता असून, त्यादृष्टीने शासनाकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.