शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: July 14, 2017 03:14 IST

ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीच्या सानपाडा येथील कॉलेजच्या चौकशीचे निर्देश तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीच्या सानपाडा येथील कॉलेजच्या चौकशीचे निर्देश तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. त्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने महाविद्यालयाला भेट देऊन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक प्रमोद नाईक यांनी दिले आहेत. सानपाडा येथील ओरिएंटल कॉलेजमध्ये कनिष्ठ व पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम घेतले जातात. तसेच बी.फार्मसी, एम.फार्मसी, बी.एड. व विधि महाविद्यालय चालविले जाते. विशेष म्हणजे ४000 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर उभारलेल्या एका सात मजली इमारतीतच हे सर्व अभ्यासक्रम घेतले जातात. अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र इमारत असणे बंधनकारक आहे. तसेच महाविद्यालयातील सेमिनार रूम, लेक्चर रूम, लायब्ररी, प्रयोगशाळा व संगणक रूम नियमानुसार नसल्याचे दिसून आले आहे. महाविद्यालयात कर्मचारी वर्ग अपुरा आहे. हेल्थ केअरची सुविधा नाही. एकूणच महाविद्यालय व्यवस्थापनाने सर्व नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार मनविसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी संबंधित विभागाकडे केली होती. त्यानुसार तंत्रशिक्षण विभागाने या तक्रारीची दखल घेत महाविद्यालयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी एस.बी. विश्वरूपे, डॉ. एम.डी. मेनन व एस.एस. मोतलिंग या तीन उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे. दरम्यान, मनविसेच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची भेट घेऊन ओरिएंटल महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी केली. कुलगुरू देशमुख यांनीसुद्धा यासंदर्भात समिती नियुक्त करून चौकशी केली जाईल, असे अश्वासन दिल्याचे मनविसेचे कळविले आहे. या मनविसेच्या या शिष्टमंडळात मनविसेचे शहराध्यक्ष सविनय म्हात्रे, मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे, मनविसेचे मुंबई विद्यापीठाचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे, संदेश डोंगरे आदींचा समावेश होता.महाविद्यालय व्यवस्थापनाने सर्व नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार मनविसेकडून करण्यात आली आहे.