शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्ष नेत्याचा ‘एकनाथी’ बंगला

By admin | Updated: November 19, 2014 00:52 IST

गत हिवाळी अधिवेशनाच्या काळात युतीतर्फे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्यात आघाडीवर असलेले तत्कालीन विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे या दोन्ही नेत्यांची

खडसेंच्या बंगल्यावर आता शिंदेंचा मुक्कामनागपूर : गत हिवाळी अधिवेशनाच्या काळात युतीतर्फे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्यात आघाडीवर असलेले तत्कालीन विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे या दोन्ही नेत्यांची या अधिवेशनातील भूमिका मात्र परस्परांच्या विरोधात असणार आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून ज्या बंगल्यात खडसे यांचा मुक्काम राहात होता त्याच बंगल्यात बसून शिंदे आता विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारच्या विरोधात रणनीती आखतील.विरोधी पक्ष नेत्याच्या बंगल्याचे हस्तांतरण अशा प्रकारे. एका एकनाथाकडून दुसऱ्या एकनाथाकडे या निमित्ताने होण्याचे चित्र पाहायला मिळेल. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचे परिणामही नागपूर अधिवेशनात पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत विरोधी बाकावर बसणारा भाजप यावेळी सत्ताधारी पक्ष असला तरी त्यांचा मित्र पक्ष मात्र सत्तेच्या बाहेर आहे. विशेष म्हणजे तो प्रमुख विरोधी पक्ष आहे. आघाडी सरकारच्या काळात एकनाथ खडसे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. ते अधिवेशनाच्या एक दिवस आधी त्यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांना बोलवून सरकार विरोधात रणशिंग फुंकायचे. त्यावेळी मित्रपक्षाचे प्रतिनिधी म्हणून एकनाथ शिंदेही तेथे उपस्थित असत. या अधिवेशनात अगदी याविरोधात चित्र पाहायला मिळेल. खडसे आणि शिंदे यांचा मुक्काम एकाच परिसरात (रविभवन परिसर) राहणार असला तरी भूमिका वेगवेगळ्या असतील. खडसे यांना मंत्री म्हणून वेगळा बंगला मिळेल तर शिंदे यांना आतापर्यंत खडसेंना मिळणारा विरोधी पक्ष नेत्यांचा बंगला मिळेल त्यामुळे गत पाच वर्षात ज्या बंगल्यात खडसेंच्या उपस्थितीत सरकार विरोधात लढण्याची व्यूव्हनीती ठरत होती आता त्याच बंगल्यात शिंदेंच्या उपस्थितीत भाजप सरकारला खिंडीत पकडण्यासाठी डावपेच आखले जाण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जाहीर केले आहे. राजकारणात चर्चेची दारे बंद होत नसतात असे सांगून त्यांनी शिवसेनेला पुन्हा सोबत घेण्याचेही संकेत दिले आहे. मात्र याला अनुकूल ठरतील अशा घडामोडी होताना दिसत नसल्याने सध्या तरी हिवाळी अधिवेशनात शिवसेनाच प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावेल असे चित्र आहे. या अधिवेशनासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांची निवासस्थाने सज्ज ठेवावीत, असे आदेश विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. (प्रतिनिधी)