शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:19 IST

Operation Sindoor: भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये २६ मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला. आता पाकिस्तानचे भारतातील स्लिपर्स सेल उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समुळ उच्चाटन करणे गरजेचे आहे, असेही या पत्रकात उद्धव ठाकरे म्हणाले.

भारतीय सैन्यदलांनी मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अचूक आणि भेदक अशी कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांना उद्ध्वस्त केले. या बरोबरच गेल्या महिन्यात पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करून २६ भारतीय पर्यटकांच्या करण्यात आलेल्या हत्येचा बदला भारताने घेतला. भारतीय सैन्यदलांच्या या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये हाहाकार माजला आहे. तर भारतात या कारवाईसाठी भारताच्या सैन्यदलांचं कौतुक केलं जात आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ऑपरेशन सिंधूर ला मिळालेल्या यशानंतर भारताच्या सैन्य दलाचं कौतुक केलं आहे. भारतीय लष्कराच्या  शौर्याला सलाम, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सैन्यदलांचं कौतुक केलं आहे. 

प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये २६ मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला. आता पाकिस्तानचे भारतातील स्लिपर्स सेल उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समुळ उच्चाटन करणे गरजेचे आहे, असेही या पत्रकात उद्धव ठाकरे म्हणाले.

भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहे, हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले आहे.भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाUddhav Thackerayउद्धव ठाकरे