शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

चकमकीत एक नक्षलवादी ठार

By admin | Updated: June 15, 2014 00:32 IST

एटापल्ली तालुक्याच्या कसनसूर पोलीस ठाण्यांतर्गत कोटमी जंगल परिसरात शनिवारी सकाळी ८ वाजता पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे.

सी-६० पथकाची कारवाई : डीव्हीसी सदस्यांच्या बैठकीदरम्यान चकमकएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली तालुक्याच्या कसनसूर पोलीस ठाण्यांतर्गत कोटमी जंगल परिसरात शनिवारी सकाळी ८ वाजता पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे. त्याचा मृतदेह पोलिसांनी हस्तगत केला आहे. या ठिकाणी वरिष्ठ कॅडरच्या नक्षल्यांची बैठक सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.एटापल्ली तालुक्याच्या कोटमी जंगल परिसरात गर्देपल्ली ते मंडोली या दरम्यान गडचिरोली पोलिसांचे सी-६० पथक पहाटेपासून नक्षलविरोधी शोध मोहीम राबवित असताना सकाळी ८ वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार सुरू केला. यावेळी पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. अर्धा तास प्रचंड चकमक चालली. या चकमकीत एक पुरूष नक्षलवादी ठार झाला. त्याचा मृतदेह पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतला आहे. या चकमकीत आणखी काही नक्षलवादी ठार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. चकमकीनंतर घटनास्थळावर सर्चिंग आॅपरेशन करण्यात आले. यात एक पिस्तुल, तीन क्लेमोर, तीन गावठी पिस्तुल, लिक्वीड एक्सप्लोसीव, एम. एम. राऊंड, बोल्ट, वायर, कॅमेरा, १५ पिट्टू व नक्षल पुस्तके पोलिसांनी जप्त केले आहे. या जंगलात नक्षलवाद्यांचा प्रशिक्षण शिबिर सुरू होते. वरिष्ठ नक्षल कॅडरची बैठकही या दरम्यान चालू होती. या शिबिरात विभागीय समिती सदस्य जोगन्ना व नर्मदा अक्का यांच्यावर उपचार सुरू होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कसनसूर नक्षल दलमच्या ३५ ते ४० नक्षलवाद्यांचा या घटनेत सहभाग असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनात नक्षलविरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. एटापल्ली तालुक्यात गेल्या एक वर्षात नक्षल घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)