शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

"अरे... आम्ही हार पत्करू, पण लाचारी नाही...!"; बाळासाहेबांचं नाव घेत फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:14 IST

"जर कुणी मतांची लाचारी स्वीकारून 'हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे' यांना 'जनाब बाळासाहेब ठाकरे' म्हणत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, कारण मतांसाठी लाचारी पत्करणारे आम्ही नाही," असे म्हणत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला.

आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने केलेली कामं जर बघितली, तर दिन, दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेत मजूर, महिला, अल्पसंख्यांक, सर्वांच्या जीवनात आम्ही परिवर्तन करत आहोत. आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही, आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. मात्र, एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, आम्ही लांगूल चालन खपवून घेणार नाही. आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन. जर कुणी मतांची लाचारी स्वीकारून 'हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे' यांना 'जनाब बाळासाहेब ठाकरे' म्हणत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, कारण मतांसाठी लाचारी पत्करणारे आम्ही नाही," असे म्हणत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. एवढेच नाही तर, "अरे आम्ही हार पतकरू, पण लाचारी पत्करणार नाही," असेही फडणवीस म्हणाले. ते मुंबईतील ओशिवरा मतदारसंघात महायुतीच्या प्राचर सभेत बोलत होते.

आम्ही हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन, सर्वांचा विकास करू, पण... -फडणवीस पुढे म्हणाले, "अरे आम्ही हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन, सर्वांचा विकास करू. पण तुम्ही, जर या ठिकाणी उलेमांच्या त्या ठिकाणी १७ मागण्या, काय मागण्या आहेत? वक्फ बोर्डाला हजार कोटी द्या, आमच्या लोकांना जे काही आमचे काजी आहेत त्यांना पगार द्या, १० टक्के मुस्लिमांना आरक्षण द्या, या १७ मागण्या, ज्या मागण्या देश हिताच्या मागण्या नाहीयेत." एवढेच नाही तर, "त्या मागण्यांवर जर या ठिकाणी काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची पार्टी लेखी देत असेल आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालत असेल आणि त्यांचे पाय चाटत असेल, तर आम्ही सहन करणार नाही. या देशामध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो स्वधर्म आम्हाला शिकवलाय, तोच चालणार आहे. मतांचं लांगुल चालन हे आम्ही चालू देणार नाही," अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा साधला."आम्ही हार पतकरू पण लाचारी पत्करणार नाही" -"या ठिकाणी जर ते व्होट जिहादचा नारा देत असतील तर व्होटांचं धर्मयुद्ध आम्हाला करता येतं. व्होटांचं धर्मयुद्ध पुकारा आणि त्या धर्मयुद्धामध्ये आपल्याला माहिती आहे, पार्थाने सांगितलं होतं, जिथे सत्य आहे तिथेच विजय आहे. सत्य आपल्या बाजूने आहे आणि म्हणून विजय देखील आपल्याच बाजूने आहे. उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी मतांकरता लाचारी पत्करली असेल, अरे आम्ही हार पतकरू पण लाचारी पत्करणार नाही, आम्ही शिवबाची पोरं आहोत, शिवबाचे मावळे आहोत," असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा