शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: September 10, 2014 00:52 IST

शहरात डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी महापालिका प्रशासन स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करीत आहे. यामुळे महापौर प्रवीण दटके संतप्त झाले असून मंगळवारी त्यांनी प्रशासनाला फटकारले.

डेंग्यूवरून महापौर संतप्त : प्रशासनाला फटकारले नागपूर : शहरात डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी महापालिका प्रशासन स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करीत आहे. यामुळे महापौर प्रवीण दटके संतप्त झाले असून मंगळवारी त्यांनी प्रशासनाला फटकारले. डेंग्यूमुळे कुणाचा मृत्यू झाला तर त्यासाठी संबंधित जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याला दोषी मानले जाईल व पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. ‘उपराजधानीत डेंग्यूचा प्रकोप’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करीत महापालिकेची यंत्रणा कशी कुचकामी ठरली याकडे लक्ष वेधले होते. महापौर दटके यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी या संदर्भात मंगळवारी बैठक घेत डेंग्यू व फायलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी तत्काळ ऐवजदारांची नियुक्ती करण्याचे निर्देश आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांना दिले. यानंतर पत्रकारांशी बोलताना महापौर दटके यांनी सांगितले की, प्रशासकीय पातळीवर दुर्लक्ष करणाऱ्याविरोधातही कारवाई केली जाईल. केलेल्या उपाययोजनांबाबत दर आठवड्याला आढावा बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. काही झोनमधून संधिग्ध रुग्णांची आकडेवारी घेतली असता त्यात तफावत दिसून आली. ही गंभीर बाब असल्यामुळे यात दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्य सरकारने जयश्री थोटे यांना मलेरिया-फायलेरिया अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. महापालिकेतर्फे डॉ. अशोक उरकुडे हे या विभागाचे काम पाहतात. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे डेंग्यूचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या कामात अडथळे येत आहेत.(प्रतिनिधी) असे आहेत निर्देश मलेरिया-फायलेरिया विभागातील कर्मचारी व अधिकारी यांचे अतिरिक्त काम काढून त्यांना फक्त डेंग्यू निर्मूलनाची जबाबदारी देण्यात यावी. खासगी व सरकारी दवाखान्यांना नोटीस बजावून दररोजचा अहवाल देण्याची सक्ती करावी. मेयो, मेडिकल व डागा हॉस्पिटलमधील डेंग्यू व मलेरिया रुग्णांची आकडेवारी गोळा करण्यासाठी महापालिकेतर्फे दररोज एक कर्मचारी तेथे जाईल. केंद्रीय, राज्य स्तरावरील शासकीय कार्यालयांचा तसेच वसाहतींचा दौरा महापालिकेचे कर्मचारी करतील. सर्व फायलेरिया निरीक्षकांनी स्थानिक नगरसेवकांशी समन्वय साधावा. यानंतर झोनल अधिकाऱ्यांना साप्ताहिक अहवाल द्यावा.