शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती अफरातफरीचा संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: December 30, 2014 00:53 IST

आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत चामोर्शी येथील स्व. राहुलभाऊ बोम्मावार

आरोपीस अटक नाही : १ कोटी ६ लाख ३१ हजार १५ रूपयांचा गैरव्यवहारगडचिरोली : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत चामोर्शी येथील स्व. राहुलभाऊ बोम्मावार कॉलेज आॅफ मॅनेजमेंट अँड टेक्नालॉजी या संस्थेच्या संचालकाने १ कोटी ६ लाख ३१ हजार १५ रूपयाची अफरातफर केल्याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र संस्थाचालक सूरज बोम्मावार (रा. सावली जि. चंद्रपूर) याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तंत्रशिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. स्व. राहुलभाऊ बोम्मावार कॉलेज आॅफ मॅनेजमेंट अँड टेक्नालॉजी या संस्थेला विविध अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रदान उपलब्ध करण्यात आली. मात्र या रक्कमेत बोगस विद्यार्थी दाखवून खऱ्या विद्यार्थ्यांची रक्कम हडप केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गडचिरोलीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी २३ डिसेंबरला सदर महाविद्यालयातील दस्ताऐवजाची प्रत्यक्ष तपासणी केली. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत प्रकल्प अधिकाऱ्यांना अफरातफर झाल्याचे आढळून आले. त्यानंतर २७ डिसेंबर रोजी चामोर्शी पोलीस ठाण्यात संस्थाचालक सूरज बोम्मावार याच्याविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली. चामोर्शी पोलिसांनी विद्यार्थ्याची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बोम्मावार याच्याविरूध्द ४०९, ४२० कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)लोकमतने केला पाठपुरावागडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र तंत्रशिक्षण परिषदेचे तांत्रिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांनी शिष्यवृत्ती उचल प्रक्रीयेत मोठा घोळ केल्याची बातमी दिनांक १९, २० व २१ डिसेंबर रोजी वृत्तमालिका चालवून पहिल्यांदा उजेडात आणली. त्यानंतर या प्रकरणाची आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी दखल घेऊन पहिल्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. आणखी ५ ते ७ संस्थाचालकांना या प्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.काय आहे नेमका घोटाळा?स्व. राहुलभाऊ बोम्मावार कॉलेज आॅफ मॅनेजमेंट अँड टेक्नालॉजी या संस्थेत ज्या विद्यार्थ्याचे नाव दाखविण्यात आली व त्यांच्या नावाने शिष्यवृत्तीची उचल करण्यात आली. परंतु ती शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांना आजतागायत वाटप करण्यात आली नाही. यात २०१३ व २०१४ मध्ये डिप्लोमा इन थ्रीडी अ‍ॅनिमेनेशन ग्राफिक्स कोर्सकरिता १२० विद्यार्थी क्षमता असताना संस्थेने २०९ विद्यार्थ्यांची नोंदणी दर्शवून सदर अभ्यासक्रमाची ४४ लाख ७३ हजार ९९० एवढी शिष्यवृत्तीची रक्क्म आदिवासी विकास विभागाकडून व ६१ लाख ५७ हजार २५ रूपयाची रक्कम समाज कल्याण विभागाकडून उचल केली. दोनही विभागाकडून १ कोटी ६ लाख ३१ हजार १५ रूपयाची उचल करून शासनाची फसवणूक केली.