शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

लाडकी बहीण योजनेच्या लाभात अडथळे, एका कॉलवर सुटणार प्रश्न; अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 00:54 IST

लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सरकारने ई-केवायसी केली. मात्र, अनेक महिलांकडून त्यात चुका झाल्या आणि पैसे येणे थांबल्याचे प्रकार समोर आले. 

लाडकी बहीण योजनेचा चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्यांना वगळण्यासाठी सरकारने ई-केवायसी केली. मात्र, या प्रक्रियेत अनेक महिलांकडून चुका झाल्या आणि त्यांना मिळणारे पैसे बंद झाले. राज्यभरात महिलांकडून तक्रारी वाढल्यानंतर राज्य सरकारने उपाय योजना सुरू केल्या आहे. त्यात आता महिलांना तातडीने शंका निरसन करता यावे आणि त्यांच्या तक्रारीची नोंद व्हावी म्हणून एक हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एका कॉलवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींचे प्रश्न सुटणार आहेत. 

राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी हेल्पलाईनबद्दलची माहिती दिली. अदिती तटकरे म्हणाल्या, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत."

तक्रार असेल, तर १८१ नंबर कॉल करा

अदिती तटकरेंनी या संदर्भात केल्या गेलेल्या उपाय योजनेचीही माहिती दिली. "या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे", असे अदिती तटकरे यांनी सांगितले. 

अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी

लाभार्थी महिलांकडून ई-केवायसीमध्ये चुका झाल्याच्या तक्रारी ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या. त्याची दखल घेत महिला व बाल विकास विभागाने प्रत्यक्ष पडताळणी करण्यास सुरूवात केली आहे. 

अदिती तटकरे यांनी सांगितले की, "काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत."

English
हिंदी सारांश
Web Title : Ladki Bahin Yojana Helpline Launched to Resolve E-KYC Issues

Web Summary : Maharashtra government launched a helpline (181) for Ladki Bahin Yojana beneficiaries facing issues with e-KYC. Anganwadi workers will verify beneficiaries' details. Minister Aditi Tatkare addressed complaints of payments being stopped due to incorrect e-KYC entries, assuring quick resolution.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAditi Tatkareअदिती तटकरेgovernment schemeसरकारी योजनाWomenमहिला