शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी नेते हनुमंत उपरे यांचे निधन

By admin | Updated: March 20, 2015 01:43 IST

ओबीसी, चलो बुद्ध की ओर अभियानाचे प्रणेते सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक तथा परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते हनुमंत उपरे उर्फ काका यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले.

बीड : ओबीसी, चलो बुद्ध की ओर अभियानाचे प्रणेते सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक तथा परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते हनुमंत उपरे उर्फ काका यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कमलबाई, पुत्र संतोष, संदीप, २ मुली, २ स्नूषा, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ओबीसी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.प्रकृती अस्वास्थ्यामुळे ११ मार्च रोजी त्यांना औरंगाबाद येथील खासगी दवाखान्यात दाखल केले होते. त्यांच्या डोक्यातील रक्तवाहिनी दबल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना १२ मार्च रोजी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचार सुरू असतानाच गुरुवारी सकाळी ९ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हनुमंत उपरे यांनी स्वबळावर परिवर्तनवादी चळवळीतून सामाजिक क्षेत्रात लक्षणीय ठसा उमटवला होता. गणराज बँक, पाइपनिर्मिती उद्योगातून त्यांनी औद्योगिक क्षेत्रातही वेगळेपण सिद्ध केले होते. २० वर्षांपेक्षा अधिक काळ ते भारिप बहुजन महासंघात होते. कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष अशी मोठी झेप घेत त्यांनी कार्यकर्ते जोडण्याचे काम केले होते. विखुरलेल्या ओबीसींना एकत्र आणून त्यांच्यात स्वाभिमान जागविण्याचा प्रयत्न केला होता. २०११मध्ये त्यांनी सत्यशोधक ओबीसी परिषदेची मुहूर्तमेढ रोवून परिवर्तनाची हाक दिली होती. ओबीसींना बौद्ध धम्माच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. ३ महिन्यांपूर्वीच त्यांनी बीड येथे विद्रोही साहित्य संमेलन घेऊन वैचारिक मशाल पेटविली होती. बौद्ध पद्धतीने आज अंत्यसंस्कारबीडमधील एमआयडीसी परिसरातील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी ६ ते दुपारी १ वाजेदरम्यान हनुमंत उपरे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर नामलगाव येथील शेतात दुपारी २ वाजता बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.अवयवदानाचा संकल्पहनुमंत उपरे यांनी आयुष्यभर सामाजिक जाणिवांचा पुरस्कार केला. मृत्यूनंतरही हा विचार जपण्यासाठी त्यांनी अवयवदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.