शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या मुद्द्यावर ओबीसी विभागच अंधारात; मंत्रिमंडळ बैठकीत दोन मंत्र्यांमध्ये तणातणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 07:18 IST

ओबीसी आरक्षणाबाबत कार्यवाही करताना आमच्या विभागाला विश्वासात घेतले जात नाही, अशी नाराजी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

मुंबई : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारच्या विभागामध्ये समन्वयाचा अभाव असल्याची बाब समोर आली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत कार्यवाही करताना आमच्या विभागाला विश्वासात घेतले जात नाही, अशी नाराजी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार करता ग्रामविकास विभागाच्या अखत्यारित येतो. तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचा विषय हा नगरविकास विभागाच्या अखत्यारित येतो. सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाबाबत सुप्रीम  कोर्टात सुनावणी सुरू आहे. ओबीसींचे राजकीय मागासलेपण सिद्ध करण्यासंदर्भातील काही पुरावे ग्रामविकास विभागाच्या वतीने कोर्टात एका अर्जाद्वारे अलीकडेच सादर केले होते. सूत्रांनी सांगितले की, अशा कार्यवाहीबाबत आमच्या विभागाला कोणतीही माहिती दिली जात नाही. माध्यमांचे प्रतिनिधी मंत्री म्हणून मला किंवा आमच्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रतिक्रिया मागतात. अशावेळी तरी ग्रामविकास विभागाने आम्हाला विश्वासात घ्यायला हवे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. न्यायालयीन बाबींची पूर्तता ग्रामविकास विभाग आधीपासूनच करीत आला आहे, असे ते म्हणाले. त्यावर या ओबीसी आरक्षणासंदर्भातील सर्व विभागांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी व मागासवर्ग आयोग यांची एक बैठक सोमवारी घेण्याचे निश्चित करण्यात आले.गोखले इन्स्टिट्यूटच्या अहवालाचा आधार पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड एकॉनॉमिक्सच्या अहवालाचा आधार शासनाने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या अर्जात घेतला असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १८ जानेवारीच्या अंकात दिले होते. विजय वडेट्टीवार यांनी दुसऱ्याच दिवशी त्याचा इन्कार केला. मात्र, असा अर्ज कोर्टात सादर झाल्याचे स्पष्ट नंतर झाले. ओबीसींची संख्येबाबत इन्स्टिट्यूटच्या अहवाल व शालेय शिक्षण विभागाच्या माहितीचाही आधार घेतल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ इम्पिरिकल डाटाला आम्ही खो देत आहोत असा अजिबात होत नाही, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षण