"आता गडकरींनाही सांगणार...!"; अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर, अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:40 IST2026-02-03T19:39:13+5:302026-02-03T19:40:29+5:30

"घटनेची चौकशी फक्त DGCI ने किंवा CID ने करून चालणार नाही, तर ही चौकशी हायकोर्टाच्या जजच्या नियंत्रणाखालीच व्हायला हवी," असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

Now I will tell Gadkari too After Ajit Pawar accidental death what exactly did NCP leader Anil Deshmukh say | "आता गडकरींनाही सांगणार...!"; अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर, अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?

"आता गडकरींनाही सांगणार...!"; अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर, अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?


अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर, काही नेत्यांकडून, या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. यातच आता, "घटनेची चौकशी फक्त DGCI ने किंवा CID ने करून चालणार नाही, तर ही चौकशी हायकोर्टाच्या जजच्या नियंत्रणाखालीच व्हायला हवी," असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर आपण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही, तुम्ही त्या छोट्या, खासगी विमानाने प्रवास टाळायला हवा, असे सांगणार आहोत, असेही देमुख यावेळी म्हणाले. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

देशमुख म्हणाले, "अजित पवार यांचा विमान अपघातात जो दुर्दैवी मृत्यू झाला, यासंदर्भात अनेकांना शंका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजित दादांच्या पक्षाचे जे जेष्ठ नेते आहेत. माननीय छगनजी भुजबळ असोत किंवा दादांच्याच पक्षाचे काही आमदार असोत. बाहेरच्यांनीही शंका व्यक्त केली आहे की, हा अजितदादाचा अपघात आहे की घातपात आहे? कारण अनेकांना शंका आहे कि, जेव्हा हा अपघात झाला त्या वेळी  नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणाले की बारामतीच्या एअरपोर्टवर व्हिजिबिलीटी कमी होती आणि त्याच्यामुळे बहुतेक हा अपघात झाला असेल. पण असं आहे कि व्हिडिबिलिटीचा जेव्हा प्रश्न आहे, विमान जेव्हा बारामतीच्या जवळपास एअरपोर्टवर आलं, तेव्हा आपणही बघितले असेल की, अनेकांनी त्या विमानाचा व्हिडिओ घेतला आणि दोन किलोमिटरवरूनही त्या विमानाचा व्हिडिओ अगदी स्पष्ट आला. जर धुकं असतं तर व्हिजिबिलिटीचा प्रश्न असता तर एवढ्या दुरून तो व्हिडिओ आला नसता आणि ते पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतंय की, हा घातपात आहे का? यामुळे सर्व चिंतित आहेत की, वस्तुस्थिती समोर यायला हवी. त्यामुळे संजय राऊत यांनी जी मागणी केलेली आहे त्याला माझंसुद्धा समर्थन आहे."
 
"आमचं एकच म्हणणं आहे की या घटनेची चौकशी DGCIच्या माध्यमाने तर होईल, पण त्यांच्यावर हायकोर्टाच्या जजच्या नियंत्रणाखाली व्हायला हवी. तेव्हाच खऱ्या गोष्टी काय आहेत? काय घडलं? काय नाही? घातपात आहे? की अपघात आहे? हे सर्व जनतेसमोर येईल, असेही देशमुख म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव घेत काय म्हणाले देशमुख? -
अजित पवारांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे, असे संजय राऊत बोललेत, असे वाटते तुम्हाला? असे विचारले असता, "आता त्यांना शंका आहे म्हणून संजय राऊत बोलले. मी धेखील काही माध्यमांना बोललो की, माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मला विमानतळावर वैगेरे भेटले तर, मी त्यांना नक्की सांगेन की तुम्हीसुद्धा त्या छोट्या, जी खासगी विमानं आहेत, त्यांनी तुमचा प्रवास टाळायला हवा," असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

Web Title : अजित पवार की मौत की जांच की मांग देशमुख ने, गडकरी को निजी विमानों से बचने की चेतावनी।

Web Summary : अनिल देशमुख ने अजित पवार की मौत की उच्च न्यायालय द्वारा निगरानी वाली जांच की मांग की, गड़बड़ी का संदेह जताया। उन्होंने नितिन गडकरी को दुर्घटना के बाद सुरक्षा चिंताओं का हवाला देते हुए निजी विमानों से यात्रा करने से बचने की सलाह देने की भी योजना बनाई है।

Web Title : Deshmukh demands inquiry into Ajit Pawar's death, warns Gadkari about private planes.

Web Summary : Anil Deshmukh seeks a High Court-monitored inquiry into Ajit Pawar's death, suspecting foul play. He also plans to advise Nitin Gadkari to avoid private planes for travel, citing safety concerns following the accident.