शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘फिटनेस’ झाले कठीण

By admin | Updated: May 27, 2014 01:39 IST

वाढत्या रस्ते अपघातांची कारणे विविध आहेत. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे वाहनाचा फिटनेस हा उत्तम असल्यास बहुतांश वेळा अपघात टाळता येतो; मात्र वाहनांना फिटनेस सर्टीफिकेट

आरटीओ : आले ‘हेडलाईट एनालायझर यंत्र’

नागपूर : वाढत्या रस्ते अपघातांची कारणे विविध आहेत. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे वाहनाचा फिटनेस हा उत्तम असल्यास बहुतांश वेळा अपघात टाळता येतो; मात्र वाहनांना फिटनेस सर्टीफिकेट देणार्‍या प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) फिटनेस घेण्यासाठी पायाभूत सुविधाच नाही. चाचण्यांचा फक्त फार्स केला जात होता. उच्च न्यायालयाचे दणक्याने आता नागपूरचे तीनही आरटीओचा फिटनेस सुधारणार आहे. या कार्यालयांना शासनाकडून नुकतेच ‘हेडलाईट एनलायझर यंत्र’ मिळाले आहे. या यंत्रामुळे वाहनांना आणखी कठीण परीक्षेला समोर जावे लागणार आहे. अवजड व व्यावसायिक वाहन रस्त्यावर धावण्यास खरोखरच सक्षम आहे का, त्याची निकषाप्रमाणे तपासणी करून उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडून वाहन फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी काही नियम आहेत. त्याअंतर्गत वाहनाची प्रत्यक्ष चाचणी आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकाकडूनच करणे बंधनकारक आहे. वाहनांचे ब्रेक कसे किंवा किती क्षमतेचे आहे, दिव्याची प्रखरता किती व कशा पद्धतीची आहे. स्वतंत्र ट्रकवर संबंधित वाहन नेमके चालते कसे, याची याअंतर्गत तपासणी होणे गरजेचे आहे. परंतु या नियमानुसार योग्य ठोकताळ्यांनी वाहनांची तपासणी करण्यासाठी कार्यालयात योग्य यंत्रणाच नाही. हा मुद्दा एका नागरिकाने समोर आणला. तो न्यायालयापुढे मांडला. न्यायालयाने याची दखल घेऊन अशी यंत्रणा नसलेल्या आरटीओ कार्यालयाची माहिती मागविली. यात अनेक कार्यालयांमध्ये दोष आढळून आले. मात्र, उच्च न्यायालयाचे खरमरीत आदेश आल्याने आता आरटीओमध्ये सुधारणा सुरू झाली आहे. विशेषत: नागपूर आरटीओ कार्यालयात वाहनाच्या ब्रेक तपासणीसाठी वाडी मार्गावर विशेष सोय करण्यात आली आहे. याशिवाय आज सोमवारी हेडलाईट तपासणीसाठी आठ ‘हेडलाईट एनलायझर यंत्र’ मिळाले आहेत. यातील हे चार यंत्र आरटीओ ग्रामीण, एक आरटीओ शहर, एक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्व आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा यांना देण्यात येणार आहे. अवजड व व्यावसायिक वाहनाचे हेडलाईट प्रखर असतात. ते एका विशिष्ट पद्धतीत असावे असा नियम आहेत. परंतु याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. अशा वाहनाचा प्रकाश समोरून येणार्‍या वाहनचालकाच्या डोळ्यावर पडल्यास त्याला काही वेळासाठी काहीच दिसत नाही. अशावेळी अपघाताची शक्यता अधिक राहते. आता हेच तपासण्यासाठी शासनाने आरटीओ कार्यालयांना ‘हेडलाईट एनलायझर यंत्र’ दिले आहे. (प्रतिनिधी)