शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

आता काँग्रेस करणार ‘शेतकऱ्यांशी चर्चा’

By admin | Updated: March 15, 2015 01:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाभडीतील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाला २० मार्च रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांची स्थिती ‘जैसे थे’ आहे.

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाभडीतील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाला २० मार्च रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. खुद्द दाभडीतही शेतकरी आत्महत्या होत आहेत. मोदींच्या या ‘चाय पे चर्चा’ने शेतकऱ्यांच्या जीवनात काहीही बदल झाला नाही, हे जगाला पटवून देण्यासाठी आता काँग्रेस याच दाभडी गावात ‘शेतकऱ्यांशी चर्चा’ हा कार्यक्रम २० मार्चलाच घेत आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत ही माहिती दिली. मोघे म्हणाले, यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील दाभडी या गावातून लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ च्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. भाजपाला एकहाती सत्ता द्या, तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी भाजपच्या हाती एकहाती सत्ता दिली. नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनविले. मात्र मोदींना दाभडी आणि शेतकऱ्यांचा विसर पडला. २० मार्च रोजी दाभडीतील या ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाला एक वर्ष होत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजही सुरू आहेत. याच दाभडी गावातील शेतकऱ्यावरही आत्महत्येची वेळ आली. जेथून देशातील शेतकऱ्यांना संबोधित केले, त्या दाभडीतील आत्महत्याही मोदींना थांबविता आली नाही. मोदींची ‘चाय पे चर्चा’ कशी फसवी होती, हे आता काँग्रेस जगाला पटवून देणार आहे. त्यासाठी याच दाभडी गावात २० मार्च रोजी ‘शेतकऱ्यांशी चर्चा’ हा कार्यक्रम काँग्रेसने आयोजित केल्याचे मोघे यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतकरी आत्महत्या प्रकरणी आघाडी सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता त्यांच्याच काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आता मुख्यमंत्री कुणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार, असा प्रश्नही मोघे यांनी उपस्थित केला. (वार्ताहर)चव्हाण, राणे, सातव येणार‘शेतकऱ्यांशी चर्चा’ या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राजीव सातव उपस्थित राहणार आहेत़