शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाची माहिती आता एका क्लीकवर

By admin | Updated: June 25, 2014 19:01 IST

विद्यापीठाची संपूर्ण माहिती विद्यापीठात येणार्‍या व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यापीठात लवकरच 'इन्फॉर्मेशन केआयओएसके' यंत्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जळगाव : विद्यापीठाची संपूर्ण माहिती विद्यापीठात येणार्‍या व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यापीठात लवकरच 'इन्फॉर्मेशन केआयओएसके' यंत्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मंगळवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. या यंत्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या विविध प्रकारची माहिती, पत्रके उपलब्ध होऊ शकणार आहेत. प्रशासकीय इमारत, ग्रंथालय, अतिथीगृह, धुळे, नंदुरबार व अमळनेर या उपकेंद्रावर ही यंत्र बसविण्यात येणार आहेत. समिती गठीत विद्यापीठात दीर्घ काळापासून कार्यरत असलेल्या ५६ कुशल, अर्धकुशल व वेतनिक म्हणून काम करणार्‍या कर्मचार्‍यांना विद्यापीठाच्या सेवेत एकत्रित वेतनावर कशा पद्धतीने सामावून घेता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. अरविंद चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. नागपूर, नांदेड व अमरावती येथील विद्यापीठांना ही समिती भेट देऊन अभ्यास करून तीन महिन्यात अहवाल देणार आहे. सामंजस्य कराराला सहमती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस आणि जी. के. स्क्रायबीन इन्स्टिट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री अँण्ड फिजिओलॉजी ऑफ मायक्रो ऑर्गेनिझम रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस करस्पॉंडिंग मेंबर ऑफ रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, मास्को यांच्या समवेत सामंजस्य कराराला यावेळी सहमती देण्यात आली. क्रीडा मंडळावर नियुक्ती विद्यापीठाच्या क्रीडा मंडळावर प्रा. के. पी. पाठक (बोदवड), प्रा. आर. एस. पगारे (धुळे), प्रा. दीपक पाटील (धरणगाव), प्रा. ए. आर. कांबळे (शहादा) यांचे तर आमंत्रित सदस्य म्हणून प्रा. क्रांती वाघ (चोपडा) यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. सूत्रसंचालन कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांनी केले. 

जर्मन भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठातील भाषा अध्ययन व संशोधन प्रशाळेत तीन महिन्याचा जर्मन  भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. विद्यापीठात जर्मन  भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मागणी होती. या शैक्षणिक वर्षापासून हा तीन महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. याबरोबरच ई-सुविधा योजनेंतर्गत या वर्षापासून एम. फार्म, एम. टेक. (पर्यावरण), एम. ई. बी.एसस्सी (अँक्च्युरियल सायन्स) या अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचाही प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.