शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी अंमलबजावणीचा निर्णय ठेवला राखून

By admin | Updated: June 30, 2017 01:53 IST

वस्तू व सेवा कर (जीएसटी) जनमानसात गोंधळाची स्थिती असली तरी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी देशभरात ६० हजार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) जनमानसात गोंधळाची स्थिती असली तरी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी देशभरात ६० हजार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. तर ६५ लाख करदाते जीएसटीच्या कक्षात आले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत जीएसटीच्या अंमलबजावणीसंदर्भातील याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.जीएसटीसाठी आवश्यक असलेली तयारी केंद्र सरकारने न केल्याने सामान्यांत गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जीएसटीची अंमलबजावणी जुलैमध्ये न करता एप्रिलपासून करावी, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. के. ताहिलरमाणी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे होती.त्यावर केंद्र सरकारने आतापर्यंत ३० राज्यांत जीएसटी कायदा लागू झाल्याची माहिती न्यायालयाला दिली. ‘३० राज्यात जीएसटी कायदा लागू झाला असून आवश्यक ते नियमही तयार करण्यात आले आहेत. जीएसटी परिषदेच्या आतापर्यंत १७ बैठका झाल्या आहेत. त्यात केंद्रीय वित्त मंत्र्यांसह सर्व राज्यांचे वित्त मंत्री उपस्थित होते. आता ३० जूनला बैठक घेण्यात येईल, अशी माहिती अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला दिली.‘संसदेने परवानगी दिल्यानंतर कोणताही कर आर्थिक वर्षात कधी लागू करायचा, याचा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे. कायद्याने त्यावर प्रतिबंध घातला जाऊ शकत नाही,’ असेही सिंग यांनी सांगितले.जीएसटीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी केंद्राने देशभरातील ६० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच जीएसटी सेवा केंद्रेही उभारण्यात आले आहेत. त्यात करदाते थेट त्यांच्या शंकांचे निरसन करू शकतात. आतापर्यंत ६५ लाख करदाते जीएसटीच्या कक्षेत आल्याची माहिती सिंग यांनी न्यायालयाला दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.