कॅम्पा कोलाला पालिकेची नोटीस

By Admin | Updated: June 15, 2014 02:09 IST2014-06-15T02:09:28+5:302014-06-15T02:09:28+5:30

वरळी येथील कॅम्पा कोला कम्पाउंडमधील इमारतींच्या बेकायदा मजल्यांवर वास्तव्य करणाऱ्या सदनिकाधारकांना मुंबई महापालिका प्रशासनाने शनिवारी नोटीस बजावली आहे

Notice of Campa Cola Municipal | कॅम्पा कोलाला पालिकेची नोटीस

कॅम्पा कोलाला पालिकेची नोटीस

मुंबई : वरळी येथील कॅम्पा कोला कम्पाउंडमधील इमारतींच्या बेकायदा मजल्यांवर वास्तव्य करणाऱ्या सदनिकाधारकांना मुंबई महापालिका प्रशासनाने शनिवारी नोटीस बजावली आहे. या नोटिसीनुसार, आता येथील कारवाई निश्चित झाली असून, एकूण तीन टप्प्यांत ही कारवाई केली जाणार आहे.
शनिवारी पालिकेने कारवाईची आगाऊ सूचना म्हणून रहिवाशांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, पालिकेने कारवाईसाठी निविदा मागविल्या होत्या. परंतु निविदा प्रक्रियेला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या मदतीने ही कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Notice of Campa Cola Municipal