शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

‘इन्कम टॅक्स’च्या ९ हजारजणांना नोटिसा

By admin | Updated: September 8, 2015 00:23 IST

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ : कोल्हापूर विभागातून नवी एक लाख आयकर खाती करण्याचे उद्दिष्ट; करदात्यांत खळबळ

संदीप खवळे - कोल्हापूर आयकर कार्यालयातंर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे चार जिल्हे येतात. या जिल्ह्यांतील विविध व्यवहार केलेल्या पण आयकर विवरणपत्र न भरलेल्या नऊ हजारजणांना आयकर विभागाने पत्रे पाठविली आहेत. या पत्रांना उत्तर न दिल्यास कायदेशीर नोटिसही बजावण्यात येणार आहे. आयकरास (इन्कम टॅक्स) उत्पन्न पात्र असूनही आयकर विवरणपत्र न भरणाऱ्यांची माहिती संकलित करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यावर्षी देशभरातून एक कोटी नवीन आयकर खाती तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कोल्हापूर विभागासाठी हे उद्दिष्ट सुमारे एक लाखाच्या आसपास आहे. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी ७ सप्टेंबर ही अंतिम मुदत होती. या पार्श्वभूमीवर आयकर कार्यालयाशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता ही माहिती मिळाली. सोमवारी विवरणपत्र न भरणाऱ्यांना आयकरपात्र उत्पन्नावर दर महिना एक टक्के व्याज आकारले जाणार आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत विवरणपत्र न भरल्यास पाच हजार रूपयांचा दंड होणार आहे. यावर्षी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने देशभरातून एक कोटी नवीन आयकर खाती उघडण्याचे उद्दिष्ट आयकर विभागाला दिले आहे. यासाठी जमीन हस्तांतरण व्यवहार, पाच लाखांवरील वाहन खरेदी, विविध कंत्राटामधून मिळालेले कमिशन, बँकेतील ठेवी, कमोडिटी बाजारातील गुंतवणूक, मोठया हॉटेलना देण्यात आलेली बिले, बचत खात्यावरील दोन लाखांपेक्षा जास्त व्यवहार, क्रेडिट कार्डवरील दोन लाखांपेक्षा जास्त व्यवहार, यासह सुमारे शंभर प्रकारच्या व्यवहारांशी संबंधित व्यवहारकर्त्यांना आयकर विभागाने रडारवर आणले आहे, अशी माहिती आयकर विभाग प्रधान आयुक्त, कोल्हापूर (रेंज -१) के. आर. मेघवाल यांनी दिली. मेघवाल म्हणाले, आयकरास पात्र असणाऱ्या व्यवहारांची माहिती विविध संस्थाच्या माध्यमातून संकलित करण्यास आयकर विभागाने सुरू केले आहे. आतापर्यंत आयकरास पात्र असलेल्या पण आयकर विवरणपत्र न भरलेल्या नऊ हजार व्यवहारकर्त्यांना पत्रे पाठविली आहेत. या पत्रांना उत्तरे न देणाऱ्यांना कायदेशीर नोटिसा काढल्या जाणार आहेत. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी लवकर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून शिबिरे घेण्यात येणार आहेत. सहकारी संस्थानाही विवरणपत्रे पाठवणे बंधनकारक असून विवरणपत्रे भरण्यासाठी नऊ हजार पतसंस्थांना आतापर्यंत विवरणपत्र भरण्यासंबंधीची पत्रे पाठविली आहेत. आयकरास पात्र उत्पन्न असलेल्यांनी पुढाकार घेऊन विवरणपत्र भरावे. याशिवाय आयकरास पात्र नसलेल्या पण खात्यावर सतत उलाढाल करणाऱ्यांनीही आयकर विवरणपत्रे भरावित. ई - फायलिंगचा टक्का वाढला आयकर विवरणपत्रे आॅनलाईन भरण्याची सोय असल्यामुळे गेल्या काही वर्षात लिखित विवरणपत्र भरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मंगळवारी सांयकाळी पाचपर्यंत कोल्हापूर आयकर विभागातील रेंज-१ मध्ये ३५१३ लिखित आयकर विवरणपत्रे भरण्यात आली. मागील वर्षी हाच आकडा ६१८२ इतका होता. आयकरासाठी वैयक्तिक करदात्याबरोबरच कंपनी, संस्थाही आयकराच्या कक्षेत आहेत. सन २०१५ - १६ कररचना २०१५ च्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार अडीच लाखांपर्यंतच उत्पन्न हे करमुक्त आहे. अडीच ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के कर आकारला जातो. पाच ते दहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के दराने करआकारणी होते. दहा लाखांवर ३० टक्के कर आकारला जातो.