शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात व समाजकारणात कोणी कोणाला मोठं करीत नाही- सदाभाऊ खोत

By admin | Updated: May 25, 2017 19:59 IST

शेतक-यांच्या हिताचे काम करीत असताना कोण काय म्हणत याकडे मी कधीच लक्ष देत नाही.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 25 - शेतक-यांच्या हिताचे काम करीत असताना कोण काय म्हणत याकडे मी कधीच लक्ष देत नाही. मला काय करायचे आहे ते मी करणार. राजकारणात आणि समाजकारणात कोणी कोणाला मोठं करीत नाही आणि कोणी कोणाला संपवित नाही. आपण आपल्या कर्तृत्वाने मोठे होतो व संपतोही, असा टोला कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांचे नाव न घेता मारला. सांगवी येथे शेतकरी आठवडा बाजाराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि फरगडे फामर्स इंडिया प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी श्रीसावता माळी शेतकरी आठवडे बाजाराची सुरुवात करण्यात आली आहे. या वेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सदाभाऊ खोत म्हणाले, शेतक-यांच्या हितासाठी मागील अडीच वर्षांत अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. मातीची भाषा कुठंही बसून समजत नाही तर त्यासाठी मातीत बसावे लागते. म्हणून आम्ही शेतक-यांसाठी बांधावरची चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे थेट शेतक-यांचे प्रश्न शेतक-यांच्या तोंडून ऐकले जातील व त्यावर तोडगा काढला जाणार आहे. राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेबद्दल बोलण्याचे त्यांनी टाळले, आम्ही काय करावे हे त्यांनी सांगण्याची गरज नाही, असा टोलाही मारला.