शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
4
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
5
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
6
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
7
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
8
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
9
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
10
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
11
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
12
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
13
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
14
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
15
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
16
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
17
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
18
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
19
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
20
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा प्रकल्प नको ! विदर्भ-मराठवाड्यातील ९५ गावातील नागरिकांचा असंतोष उफाळला; ४५० आंदोलकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:38 IST

Yavatmal : निम्न पैनगंगा प्रकल्पाचे थांबलेले काम पुन्हा सुरू झाल्यानंतर विदर्भ-मराठवाड्यातील ९५ गावातील नागरिकांचा असंतोष उफाळून आला आहे. प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याच्या भीतीने नागरिकांनी शनिवारी (२९ नोव्हेंबर) खडका-खंबाळा या प्रकल्पस्थळी धडक देत आंदोलन छेडले.

लोकमत न्यूज नेटवर्कसावळी सदोबा (यवतमाळ) : निम्न पैनगंगा प्रकल्पाचे थांबलेले काम पुन्हा सुरू झाल्यानंतर विदर्भ-मराठवाड्यातील ९५ गावातील नागरिकांचा असंतोष उफाळून आला आहे. प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याच्या भीतीने नागरिकांनी शनिवारी (२९ नोव्हेंबर) खडका-खंबाळा या प्रकल्पस्थळी धडक देत आंदोलन छेडले. या प्रकरणी ४५० आंदोलकांवर पारवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकल्प थांबविण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून नागरिकांकडून होत असली तरी, शासनाकडून काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे. शनिवारी त्यांनी अधिकाऱ्यांना काम तात्काळ बंद करण्याची मागणी केली. काही वेळानंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले. आश्वासन नको काम आत्ताच बंद करा. जेसीबी आणि टिप्पर लगेच या ठिकाणावरून हटवा नाहीतर आम्ही येथून हलणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला.

आंदोलनकर्त्यांचा संताप वाढल्याने अधिकारी आणि नागरिकांमध्ये शाब्दिक वादाचे प्रसंग घडले. परिस्थिती तणावपूर्ण असताना काही आंदोलकांनी प्रकल्पस्थळी उभ्या टिप्परच्या काचा फोडल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले. संबंधित विभागाने अखेर काम तात्पुरते थांबवून जेसीबी, टिप्पर आणि अन्य यंत्रसामग्री स्थळावरून बाहेर काढली. यानंतर काही प्रमाणात परिस्थिती शांत झाली. घटनेनंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पारवा पोलिस ठाण्यात तक्रार केली. या आधारे धरणविरोधी संघर्ष समितीच्या ५७ प्रमुख आंदोलनकांसह ४५०हून अधिक नागरिकांवर गुन्हे नोंदवले आहेत.

शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली

शासकीय कामात अडथळा आणणे, दहशत निर्माण करणे आणि शासकीय मालमत्तेची तोडफोड करणे या कलमाखाली कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या कारवाईनंतर परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास पारवा पोलिसांकडून केला जात आहे. निम्म पैनगंगा प्रकल्पावरून निर्माण झालेला संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pan Ganga Project Faces Opposition: Farmers Protest, Cases Filed

Web Summary : Farmers in Vidarbha and Marathwada protest the Lower Pan Ganga project fearing land loss. Protesters damaged property, leading to police action against 450 individuals for obstructing government work. Tensions remain high as the project's future hangs in the balance.
टॅग्स :Vidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडाYavatmalयवतमाळnagpurनागपूरPoliceपोलिस