पैनगंगा प्रकल्प नको ! विदर्भ-मराठवाड्यातील ९५ गावातील नागरिकांचा असंतोष उफाळला; ४५० आंदोलकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:38 IST2025-12-01T15:37:34+5:302025-12-01T15:38:02+5:30

Yavatmal : निम्न पैनगंगा प्रकल्पाचे थांबलेले काम पुन्हा सुरू झाल्यानंतर विदर्भ-मराठवाड्यातील ९५ गावातील नागरिकांचा असंतोष उफाळून आला आहे. प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याच्या भीतीने नागरिकांनी शनिवारी (२९ नोव्हेंबर) खडका-खंबाळा या प्रकल्पस्थळी धडक देत आंदोलन छेडले.

No to the Painganga project! Discontent among citizens of 95 villages in Vidarbha-Marathwada flared up; 450 protesters booked | पैनगंगा प्रकल्प नको ! विदर्भ-मराठवाड्यातील ९५ गावातील नागरिकांचा असंतोष उफाळला; ४५० आंदोलकांवर गुन्हा दाखल

No to the Painganga project! Discontent among citizens of 95 villages in Vidarbha-Marathwada flared up; 450 protesters booked

लोकमत न्यूज नेटवर्क
सावळी सदोबा (यवतमाळ) :
निम्न पैनगंगा प्रकल्पाचे थांबलेले काम पुन्हा सुरू झाल्यानंतर विदर्भ-मराठवाड्यातील ९५ गावातील नागरिकांचा असंतोष उफाळून आला आहे. प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याच्या भीतीने नागरिकांनी शनिवारी (२९ नोव्हेंबर) खडका-खंबाळा या प्रकल्पस्थळी धडक देत आंदोलन छेडले. या प्रकरणी ४५० आंदोलकांवर पारवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकल्प थांबविण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून नागरिकांकडून होत असली तरी, शासनाकडून काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे. शनिवारी त्यांनी अधिकाऱ्यांना काम तात्काळ बंद करण्याची मागणी केली. काही वेळानंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले. आश्वासन नको काम आत्ताच बंद करा. जेसीबी आणि टिप्पर लगेच या ठिकाणावरून हटवा नाहीतर आम्ही येथून हलणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला.

आंदोलनकर्त्यांचा संताप वाढल्याने अधिकारी आणि नागरिकांमध्ये शाब्दिक वादाचे प्रसंग घडले. परिस्थिती तणावपूर्ण असताना काही आंदोलकांनी प्रकल्पस्थळी उभ्या टिप्परच्या काचा फोडल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले. संबंधित विभागाने अखेर काम तात्पुरते थांबवून जेसीबी, टिप्पर आणि अन्य यंत्रसामग्री स्थळावरून बाहेर काढली. यानंतर काही प्रमाणात परिस्थिती शांत झाली. घटनेनंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पारवा पोलिस ठाण्यात तक्रार केली. या आधारे धरणविरोधी संघर्ष समितीच्या ५७ प्रमुख आंदोलनकांसह ४५०हून अधिक नागरिकांवर गुन्हे नोंदवले आहेत.

शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली

शासकीय कामात अडथळा आणणे, दहशत निर्माण करणे आणि शासकीय मालमत्तेची तोडफोड करणे या कलमाखाली कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या कारवाईनंतर परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास पारवा पोलिसांकडून केला जात आहे. निम्म पैनगंगा प्रकल्पावरून निर्माण झालेला संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title : पैनगंगा परियोजना का विरोध: किसानों का प्रदर्शन, मामले दर्ज

Web Summary : विदर्भ और मराठवाड़ा के किसान पैनगंगा परियोजना का विरोध कर रहे हैं, उन्हें भूमि हानि का डर है। प्रदर्शनकारियों ने संपत्ति को नुकसान पहुंचाया, जिसके कारण 450 लोगों के खिलाफ सरकारी काम में बाधा डालने के लिए पुलिस कार्रवाई की गई। परियोजना का भविष्य अधर में होने से तनाव बरकरार है।

Web Title : Pan Ganga Project Faces Opposition: Farmers Protest, Cases Filed

Web Summary : Farmers in Vidarbha and Marathwada protest the Lower Pan Ganga project fearing land loss. Protesters damaged property, leading to police action against 450 individuals for obstructing government work. Tensions remain high as the project's future hangs in the balance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.