शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेतून मेघे कुटुंबातून कुणीही लढणार नाही

By admin | Updated: June 23, 2014 01:19 IST

आपण ५ जुलै रोजी भाजपमध्ये विनाशर्त प्रवेश करणार आहेत. आपण भाजपकडे कुठलेही पद किंवा तिकिटाची मागणी केलेली नाही. वर्धा लोकसभेंतर्गत येणाऱ्या कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून

दत्ता मेघे यांची स्पष्टोक्ती : नागपुरात समीरबाबत निर्णय गडकरी घेतील नागपूर : आपण ५ जुलै रोजी भाजपमध्ये विनाशर्त प्रवेश करणार आहेत. आपण भाजपकडे कुठलेही पद किंवा तिकिटाची मागणी केलेली नाही. वर्धा लोकसभेंतर्गत येणाऱ्या कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून पुत्र सागर किंवा समीर यापैकी कुणीही निवडणूक लढविणार नाहीत. नागपुरातून समीरला उमेदवारी द्यायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी घेतील, आमचा कुठलाही आग्रह नाही, असे माजी खा. दत्ता मेघे यांनी स्पष्ट केले आहे.लोकसभा निवडणुकीत वर्धेतून काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेले सागर मेघे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर माजी खा. दत्ता मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय जाहीर केला. मेघेंचा भाजप प्रवेश व पुत्र सागर- समीर यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या चर्चेमुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली होती. सागर यांनी देवळीतून विधानसभेची तर समीर हे पुढील वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवावी, असा फार्म्युला भाजपमधील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर मांडला होता. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना दत्ता मेघे म्हणाले, वर्धेत रणजित कांबळे, चारुलता टोकस यांनी आपल्याला मानसिक त्रास दिला. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळात होणारी प्रायमरी निवडणूक वर्धेवर ढकलली. माझी गडकरींशी असलेली मैत्री मी कधीच लपविली नाही. वर्धेतील काँग्रेस नेत्यांनी याचे भांडवल करीत दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आपल्याविरोधात लॉबिंग केले. यामुळे आपण भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. यापुढे सागर हे वर्धेत विधायक कामे करतील. पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांचे प्रश्न सोडवतील. भाजपचा प्रचार करतील. तेथील भाजपच्या जुन्या लोकांना आपल्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतील. आपण आपला जास्तीत जास्त वेळ नागपुरात देऊ. पुत्र समीर यांना नागपुरातून विधानसभेत उतरवायचे की नाही, कोणत्या मतदारसंघात लढवायचे याबाबतचा अंतिम निर्णय गडकरी घेतील. त्यांचाच निर्णय अंतिम असेल. मी कार्यकर्त्यांना जपत आलो आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना बाजूला सारून मुलाला पुढे करणे मलाच योग्य वाटत नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)