शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
अब्जाधीश असूनही पान मसाल्याची जाहिरात का? यूट्यूबर ध्रुव राठीचे शाहरुख खानला गंभीर प्रश्न; पैशांचा हिशोब सांगितला
3
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
4
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
5
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
6
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल
7
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
8
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
9
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
10
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
11
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
12
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
13
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
14
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
15
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
16
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
17
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
18
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
19
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
20
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...

गयारामांना ‘नो एन्ट्री’! शरद पवारांची भूमिका; पद्मसिंहांचे नाव निघताच जोडले हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 09:10 IST

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खा. पवार सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण परत येऊ इच्छित आहे.

उस्मानाबाद : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना आता परत पक्षात घेणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खा. पवार सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण परत येऊ इच्छित आहे. त्याविषयी आम्ही चर्चा करून निर्णय घेतोय. परंतु, काहींच्या बाबतीत आम्ही पक्का निर्णय घेतलाय. आता त्यांना पुन्हा घेणे नाही. ‘गेलात तिथे सुखी रहा’, असे सांगतोय़ उस्मानाबादच्या बाबतीत हाच निर्णय घेतल्याचे सांगून पद्मसिंह यांच्या कुटूंबास आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याचे पवार यांनी त्यांचे नाव न घेता सांगितले. शिवाय डॉ. पाटील यांचे नाव निघताच त्यांनी कोपरापासून हात जोडले!

डॉ. पद्मसिंह पाटील हे पवारांचे जवळचे नातलग आहेत. त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजपप्रवेश पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. राणा जगजितसिंह हे अजित पवारांच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा होती. मात्र खा. पवारांच्या आजच्या विधानाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

एकनाथ खडसेंच्या पक्षांतरावर टाळले भाष्य -भाजप नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पक्षासाठी मोठे कष्ट घेतलेत. विरोधी पक्षनेते म्हणून ते प्रभावी होते. विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. याची नोंद पक्ष घेत नाही, असे खडसेंना वाटत असेल. तसेच दुसरा पक्ष त्याची नोंद घेतो असेही त्यांना वाटले असेल, इतकेच बोलून खडसेंच्या पक्षांतरावरील वावड्यावर पवारांनी पूर्ण भाष्य करणे टाळले.

या नेत्यांनी सोडला पक्ष : विधानसभा निवडणुकीपूर्वी -जयदत्त क्षीरसागर, मधुकर पिचड, शिवेंद्रराजे भोसले, र्वैभव पिचड, राणा जगजितसिंह पाटील, संदीप नाईक, सचिन अहिर आदी नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून इतर पक्षात प्रवेश केला आहे. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी