शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामांची सक्ती नको

By admin | Updated: October 9, 2015 02:41 IST

निवडणूक कार्यक्रमाची कामे करण्याची सक्ती शिक्षकांवर करू नका. ते स्वखुशीने काम करण्यास तयार असले, तरच त्यांना काम द्या. कामास नकार देणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची किंवा

मुंबई : निवडणूक कार्यक्रमाची कामे करण्याची सक्ती शिक्षकांवर करू नका. ते स्वखुशीने काम करण्यास तयार असले, तरच त्यांना काम द्या. कामास नकार देणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई करू नका, असा अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला. उच्च न्यायालयाच्या या अंतरिम आदेशामुळे निवडणूक कार्यक्रमाला जुंपलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना निवडणूक आयोग शिक्षकांना निवडणूक कार्यक्रमाच्या कामाला जुंपत आहे. असे म्हणत नवी मुंबई महापालिकेच्या ७४ शाळांतील सुमारे ३५० शिक्षकांनी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ५ प्राथमिक शिक्षक संघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शिक्षकांना शालेय कामाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामाला जुंपू नये, असे नमूद केलेले असतानाही निवडणूक आयोग शिक्षकांना निवडणुकीचे काम लावत आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत; आणि अशातच याद्या अद्ययावत करण्याचे काम शिक्षकांना लावण्यात आले आहे. यास नकार दिला तर शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई करण्याची धमकी निवडणूक आयोग देत आहे. या कामातून शिक्षकांना वगळण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.त्यावर खंडपीठाने शिक्षकांनाच का वेठीस धरण्यात येते? अशी विचारणा निवडणूक आयोगाडे केली असता, निवडणूक आयोगाने अन्य सरकारी संस्था या कामासाठी कर्मचारी देत नसल्याची माहिती खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी) महापालिका कर्मचारी न देण्याची भूमिकाकोणीच काम करत नाही म्हणून हे शिक्षकांना का वेठीस धरता? तुम्हाला (निवडणूक आयोग) यावर पर्याय काढावा लागेल. निवडणुकीची कामे महत्त्वाची की शिक्षण महत्त्वाचे? असे म्हणत खंडपीठाने निवडणूक आयोगाला शिक्षकांना निवडणुकीची कामे करण्यासाठी सक्ती करू नका, असे बजावले. शिक्षक स्वखुशीने हे काम करण्यास तयार असतील तर ठीक आहे. मात्र त्यांच्यावर सक्ती करू नका. कामास नकार देणाऱ्या शिक्षकांवर कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई करू नका, असे अंतरिम आदेश खंडपीठाने निवडणूक आयोगाला देत या याचिकेवरील पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.