शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नववी, अकरावीची पुनर्परीक्षा

By admin | Updated: June 10, 2016 01:06 IST

शाळेतील विद्यार्थ्यांकडे शाळेतील शिक्षकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे तब्बल ५५ विद्यार्थी अकरावीमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे.

पुणे : येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेतील विद्यार्थ्यांकडे शाळेतील शिक्षकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे तब्बल ५५ विद्यार्थी अकरावीमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेऊन त्यातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काळात राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.दहावी - बारावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची निकालानंतर एक महिन्यानंतर पुनर्परीक्षा घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नववी व अकरावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचा विचार शासनस्तरावर सुरू झाला आहे. शिक्षण विभागातर्फे लवकरच याबाबत अध्यादेश काढला जाण्याची शक्यता शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. काही कारणास्तव विद्यार्थी एखाद्या पेपरला गैरहजर राहिल्यास किंवा प्रकल्प, तोंडी परीक्षांचे गुण देण्याचे राहिल्यास संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा घेवून त्यांना उत्तीर्ण करण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांकडून शाळांना दिले आहेत. त्याचप्रमाणे काही शाळाही स्वत:हून अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत आहेत. विद्यार्थी हितासाठी काही निर्णय घेतले जातात. मात्र, नववी व अकरावीमध्ये नापास होणाऱ्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेणे कायद्यात बसते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.काही कारणास्तव परीक्षा न देऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेता येते. मात्र, नेताजी शाळेतील अकरावीमधील ५५ नापास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. शिक्षकांनी या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा न घेता त्यांना शून्य गुण दिले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी नापास झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, काही विद्यार्थी सर्व परीक्षा देवून ही नापास झाले आहेत. तरीही त्यांची परीक्षा घेतली जात आहे. यावर नेताजी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा शिवशरण म्हणाल्या, ‘‘शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार नापास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. पालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून परीक्षा घेण्याची परवानगी प्राप्त झाली आहे.’’नेताजी शाळेतील अनेक विद्यार्थी नापास झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यावर पालिकेच्या उपायुक्तांकडून संबंधित विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभागाने परवानगी घेतली आहे. त्यानुसार शाळेत विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जात असेल तर अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांची का घेवू नये.- शिवाजी दौंडकर, माध्यमिक शिक्षणप्रमुख, पुणे महानगरपालिका