शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बातम्यांचा धनी शोधणार

By admin | Updated: July 11, 2014 00:38 IST

‘नेतृत्वबदला’च्या बातम्या पेरल्या जात असून, त्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जाणार आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
‘नेतृत्वबदला’च्या बातम्या पेरल्या जात असून, त्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जाणार आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री चव्हाण दोन दिवस राजधानीत होते.  बुधवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व  गुरुवारी  उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. त्यानंतर महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील रणनीतीविषयी पक्षश्रेष्ठींशी सविस्तर चर्चा झाली.  साधारणत: 2क् ते 25 ऑगस्टच्या दरम्यान राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू होईल. त्याआधी अनेक महत्त्वाच्या विषयांचा पाठपुरावा करायचा आहे. 
नेतृत्वबदलाच्या बातम्यांविषयी ते म्हणाले, या बातम्या प्रमोट केल्या जात आहेत. त्यामागे कोण आहे, त्याची पद्धत काय आहे आणि कोणत्या वेळेत त्या दिल्या जातात,   याचा कसून शोध घेतला जात आहे. प्रशासन व पक्ष संघटनेवर परिणाम करणा:या या बातम्यांची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली असून लवकरच सत्य काय ते बाहेर येईल, असा गर्भित इशाराही त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना दिला.
निवडणूक स्वबळावर लढवायची की आघाडीसोबत, याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे स्पष्ट करून ते म्हणाले, जागावाटपाचा फॉम्यरुला जुनाच आहे. त्यात बदल संभवत नाही. राष्ट्रवादीमुळे काँग्रेसला फटका बसेल का, असे विचारता ते म्हणाले, सव्र्हे करावा लागेल!
 
च्महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प केंद्राकडे मान्यतेसाठी पडून आहेत. पायाभूत सोयी, सुरक्षा आणि विकासासाठी निधी आदी विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच आपण भेट घेणार आहेात, असे मुख्यमंत्री म्हणाले.