शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या सिमची ‘नऊ’लाई लवकरच अवतरणार

By admin | Updated: May 8, 2015 04:42 IST

सध्या दोन मोबाइल क्रमांक हवे असतील तर दोन सिम कार्ड खरेदी करावी लागतात. परंतु एकाच सिम कार्डावर एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ मोबाइल नंबर चालतील असे तंत्रज्ञान

मुंबई : सध्या दोन मोबाइल क्रमांक हवे असतील तर दोन सिम कार्ड खरेदी करावी लागतात. परंतु एकाच सिम कार्डावर एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ मोबाइल नंबर चालतील असे तंत्रज्ञान विकसित होत असून, चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत ते भारतीय बाजारात येणार आहे. मोबाइल हँडसेट क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्लॅकबेरीतर्फे हे क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित होत आहे. ‘व्हर्च्युअल सिम प्रोव्हिजनिंग’ ही संकल्पना नवी नसली तरी आजवर केवळ हे तंत्रज्ञान कागदावरच मांडले गेले. कंपनीने हे विकसित केले असून, याच्या तांत्रिक तपासण्या सध्या सुरू आहेत. हे तंत्रज्ञान बाजारात आल्यानंतर मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आणि मोबाइल हँडसेट अशा मोबाइल बाजारपेठेत लक्षणीय बदल होतील; तसेच काही नवी व्यवस्थाही विकसित होईल. मोबाइल कंपन्यांच्या संघटनेने गेल्या नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या एका जागतिक सर्वेक्षणानुसार, एकापेक्षा जास्त मोबाइल क्रमांक बाळगण्याचा ट्रेंड भारतामध्ये वाढीला लागत असून, १०पैकी किमान ४ लोकांकडे स्वत:चे दोन क्रमांक आहेत. पण दोन क्रमांकांसाठी दोन हँडसेट बाळगावे लागू नयेत याकरिता मोबाइल हँडसेट कंपन्यांनी बाजारात आणलेल्या ड्युएल हँडसेटना म्हणजे एका हँडसेटमध्ये दोन सिम कार्ड सामावतील अशा हँडसेटला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतीय बाजारात सध्या महिन्याकाठी ३० लाख ड्युएल हँडसेटची विक्री होते. परंतु, हे तंत्रज्ञान बाजारात आल्यानंतर ड्युएल हँडसेटची गरज संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिंगल सिम मोबाइल हँडसेटची विक्री वाढतानाच त्यातही नवीन आकर्षक फिचर्ससह हँडसेट बाजारात येतील. (प्रतिनिधी)