शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भारतात ‘लष्कर’ची नवी संघटना?

By admin | Updated: June 14, 2014 04:31 IST

अनेक म्होरके आणि सदस्यांच्या अटकेमुळे इंडियन मुजाहिदीन निष्प्रभ झाल्याने भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तय्यबा नवी दहशतवादी संघटना स्थापन करण्याच्या विचारात

डिप्पी वांकाणी, मुंबईअनेक म्होरके आणि सदस्यांच्या अटकेमुळे इंडियन मुजाहिदीन निष्प्रभ झाल्याने भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तय्यबा नवी दहशतवादी संघटना स्थापन करण्याच्या विचारात आहे, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एवढेच नव्हे तर इंडियन मुजाहिदीनचे प्रशिक्षित दहशतवादी भारतात आपल्या मनाप्रमाणे काम करीत नसल्याचे मत असल्याने लष्कर-ए-तय्यबा मुजाहिदीनच्या आझमगढ गटाच्या दोन डझनांहून अधिक दहशतवाद्यांचा वापर पाकिस्तानमधील फेडरली अ‍ॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरियाज (फाटा) मधील वझिरीस्तान प्रांतात लढण्यासाठी करीत आहे, अशी ताजी माहितीही गुप्तहेर संघटनांच्या हाती आल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या सूत्रांच्या म्हणण्यानुसार यासीन भटखळ, वकास आणि तबरेझ हे तीन महत्त्वाचे हस्तक पकडले गेल्यानंतर इंडियन मुजाहिदीनला बॉम्ब बनवणाऱ्या आणि स्फोटकांची तजवीज व जुळणी करणाऱ्या प्रशिक्षित दहशतवाद्यांची वानवा जाणवत आहे. भारतात दहशतवादी कारवाया करण्यात कमी पडल्याने इंडियन मुजाहिदीनचे पाकिस्तानमधील आश्रयदाते त्यांच्यावर नाराज असून या विषयावरून त्यांनी पाकिस्तानमध्ये असलेला संघटनेचा म्होरक्या रियाझ भटखळ याला चांगलेच धारेवर धरले होते. इतके की, त्याचा मोबाइल फोन आणि अन्य वस्तूही काढून घेण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात पैसा ओतूनही भारतात पुरेसा हिंसाचार घडवण्यात अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सकडून (आयएसआय) त्याला मारहाणही करण्यात आली. ‘एनआयए’च्या अधिकाऱ्याने सांगितले की, इंडियन मुजाहिदीनमधील अंतर्गत वादांमुळे मूळ भटखळ या गावच्या असलेल्या रियाझच्या गटापासून मिर्झा शाद बेगच्या नेतृत्वाखालील आझमगढ गटाने फारकत घेतली आहे. सध्या या संघटनेत बेगचा आझमगढ गटच अधिक प्रभावी आहे.