शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नव्या सरकारचे कायदे संविधानविरोधी

By admin | Updated: March 15, 2015 00:36 IST

भूसंपादन कायदा, महिलांच्या विषयीचा जर एखादा कायदा असेल तर तो मोडीस काढून त्यांनी दुसरा कायदा तयार केला आहे.

पुणे : नवीन सरकारने संविधानाच्या विरोधी कायदे काढले आहेत. त्यांचे ते पालन करीत आहे. भूसंपादन कायदा, महिलांच्या विषयीचा जर एखादा कायदा असेल तर तो मोडीस काढून त्यांनी दुसरा कायदा तयार केला आहे. अशा वेळी समाजसंस्थेने पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.स्वाधार या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका मीनाक्षी आपटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘समर्पिता’ या अंकाचे प्रकाशन निवारा सभागृहात शुक्रवारी झाले. या वेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक मीरा बोरवणकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू वंदना चक्रवर्ती, स्वधारच्या अध्यक्षा सरिता भट आदी उपस्थित होत्या. पाटकर म्हणाल्या, ‘समाजात जर एखादा बदल आपल्याला करायचा असेल, तर कायद्याविरोधी काम करणे गरजेचे आहे, तरच आपल्या महाराष्ट्राचा विकास होईल, असे मला वाटते. मीनाक्षी आपटे यांनी जे समाजकार्य केले त्याला प्रसिद्धी मिळाली नाही; पण तळागाळातल्या प्रत्येक अज्ञान घटकांसाठी लढल्या. सरकारचे ज्या घटकाकडे दुर्लक्ष झाले, त्यासाठी आपटे या लढत होत्या. समाजकार्य करणाऱ्या अनेक संस्था जर एकत्र आल्या, तरच समाज सुधारू शकतो. बोरवणकर म्हणाल्या, ‘‘शासन, प्रशासन आणि स्वयसेवी संस्था जर एकत्र आल्या, तर देश घडू शकेल.’’चक्रवर्ती म्हणाल्या, ‘‘मीनाक्षी मॅडम विद्यार्थिनींसोबत मैत्रिणीसारख्या राहिल्या. कोणताही प्रकल्प त्यांनी सुरू केला, तर तो पूर्णत्वाला नेल्याशिवाय त्या शांत बसत नव्हत्या.’’ त्यांच्या आठवणींना या वेळी उजाळा मिळाला. (प्रतिनिधी)