कॅम्पा कोलाच्या नवीन वादाची सुनावणी १८ जूनला

By Admin | Updated: June 17, 2014 03:29 IST2014-06-17T03:29:06+5:302014-06-17T03:29:06+5:30

पालिकेच्या याचिकेनुसार, १७९०७.६० चौ.मी.चा हा भूखंड प्युअर ड्रींक कंपनीला १९६२मध्ये ३० वर्षांच्या भाडे करारावर देण्यात आला.

The new controversy hearing of Campa Cola on June 18 | कॅम्पा कोलाच्या नवीन वादाची सुनावणी १८ जूनला

कॅम्पा कोलाच्या नवीन वादाची सुनावणी १८ जूनला

मुंबई : वादग्रस्त कॅम्पा कोला सोसायटी उभी असलेला मूळ भूखंड महापालिकेचा असताना त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता गृहनिर्माण उप निबंधकाने या भूखंडाचे हस्तांतरण सोसायटीच्या नावे केल्याप्रकरणी पालिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, यावर येत्या १८ जूनला सुनावणी होणार आहे़
या हस्तांतरणाला डीम कन्व्हेंस असे म्हणतात. एखाद्या गृहनिर्माण सोसायटीला बिल्डरने भूखंडाचे हस्तांतरण दिले नसल्यास ही सोसायटी निबंधकाकडे यासाठी अर्ज करू शकते. त्यावर निबंधक रीतसर सुनावणी घेतो व भूखंड हस्तांतरणाचे आदेश जारी करतो.
पालिकेच्या याचिकेनुसार, १७९०७.६० चौ.मी.चा हा भूखंड प्युअर ड्रींक कंपनीला १९६२मध्ये ३० वर्षांच्या भाडे करारावर देण्यात आला. या कराराअंतर्गत कंपनी येथे फिल्म स्टुडिओ, कार्यालय व कामगारांसाठी निवास उभारणार होते. त्यानंतर कंपनीने या भूखंडावर गृहनिर्माण सोसायटी उभारण्यास शुभ, इशा-एकता, मिड-टाऊन, पटेल व आॅर्किड सोसायटीला परवानगी दिली; आणि आता या सोसायटीचा डीम कन्व्हेंस मंजूर झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The new controversy hearing of Campa Cola on June 18