शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

वेळुकरांच्या पात्रता निश्चितीस नवी समिती

By admin | Updated: February 25, 2015 02:33 IST

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांची पात्रता पुन्हा तपासण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कुलपतींनी आपल्या अधिकाराचा

तेजस वाघमारे, मुंबईमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांची पात्रता पुन्हा तपासण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कुलपतींनी आपल्या अधिकाराचा वापर करीत वेळुकरांना पदापासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. वेळुकर यांची पात्रता पुन्हा तपासण्यास नव्या शोध समिती नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी शोध समितीतील एका सदस्याच्या निवडीसाठी विद्यापीठाच्या विद्वत आणि व्यवस्थापन परिषदेची संयुक्त बैठक ९ मार्च रोजी बोलावली आहे.विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्यापासून वेळुकर यांच्या नियुक्तीला प्राध्यापक, विद्यार्थी संघटनांसह अनेकांनी विरोध दर्शविला होता. शासन दरबारी पत्रव्यवहार करूनही दाद मिळत नसल्याने काही सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या महिन्यात न्यायालयाने वेळुकर यांची पात्रता पुन्हा तपासण्याचे आदेश दिले आहेत. चार आठवड्यांच्या आत समिती नियुक्त करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कुलपती आणि राज्यपाल कार्यालयाने जुन्या शोध समितीला बाजूला सारून नवी शोध समिती निवडण्याचा निर्णय घेतला आहे.शोध समितीमध्ये संबंधित विद्यापीठातील विद्वत व व्यवस्थापन परिषदेतून एक सदस्य निवडण्यात येतो. त्यानुसार नवी शोध समिती निवडण्यास ९ मार्च रोजी या परिषदेची संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या हालचाली राज्यपाल कार्यालयाकडून सुरू झाल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीमध्ये एका सदस्याची निवड करून ती राज्यपाल कार्यालयाला कळविण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यपाल नियुक्त एक सदस्य आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव अशी तीन सदस्यांची शोध समिती तयार होणार आहे. ही समिती वेळुकर यांच्या पात्रतेबाबत ठरविणार आहे.