शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

रंगभूमीसाठी नवीन कलाकार हवेत : देशपांडे

By admin | Updated: November 5, 2014 00:08 IST

अशी अपेक्षा साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केली.

उत्तमकुमार जाधव- चिपळूण -गेल्या काही वर्षांत विविध कारणांनी मराठी रंगभूमीवरील नाट्य चळवळ काहीशी थंडावलेली दिसते. दूरदर्शनवरील नवीन मालिकांमुळे प्रेक्षकांचे घरबसल्या मनोरंजन होत आहे. त्यामुळे नाट्यगृहात जाऊन नाटक बघणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कोकण ही खऱ्या अर्थाने कलावंतांची भूमी असून, या भूमीतील कलाकारांनी रंगभूमीसाठी प्रचंड योगदान दिले आहे. मराठी रंगभूमीसाठी नवीन कलाकार निर्माण व्हायला हवेत, अशी अपेक्षा साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केली.गणपतराव जोशी, केशवराव दाते, मामा पेंडसे, शंकर घाणेकर, काशिनाथ घाणेकर, मच्छींद्र कांबळी अशा प्रदीर्घ कलावंतांनी मराठी रंगभूमीसाठी योगदान दिले आहे. आजही वैभव मांगलेंसारखा कलाकार रंगभूमी गाजवताना दिसतो. कोकणात नाटक हे नुसते मनोरंजनाचे साधन नव्हे; तर ती ईश्वरसेवा म्हणून सादर केली जाते आणि ही सेवा करण्यासाठीच कोकणच्या मातीत अनेक कलाकार घडतात. बदलत्या युगातही ग्रामीण भागात आजही देवांचे उत्सव होतात. त्यावेळी लळीतप्रसंगी नाटक सादर केले जाते. जशी कलावंतांची परंपरा आहे, तशीच नाट्यलेखकांची, संगीतकारांची परंपरा आहे, असे देशपांडे म्हणाले. वसंत देसाई, राम मराठे, गोविंदराव पटवर्धन अशी दिग्गज मंडळी नाट्यसंगीत क्षेत्रात गाजली. वसंत जाधव यांनी लिहिलेली नाटके खेडोपाडी आजही होतात. त्याचे शेकडो प्रयोग झाले. चिपळूणमध्ये असणारे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बंद पडले. तीच स्थिती आज कोकणातील अन्य शहरांची आहे. सुसज्ज असे नाट्यगृह नाही. वाढती महागाई, तिकिटांचे दर सामान्यांच्या खिशाला न परवडणारे आहेत. त्यामुळे ही चळवळ काहीशी थंडावलेली आहे. तरीही न थांबता, न थकता इथले कलाकार घेतला वसा न टाकता सांभाळत आहेत. रत्नागिरीतील खल्वायनसारखी संस्था संगीत नाटकांचे प्रयोग सादर करताना दिसते. अनिल दांडेकरांसारखा लेखक प्रायोगिक रंगभूमीवर प्रयोग सादर करीत आहे. या पंखांना नटराजाबरोबरच आम्हा सर्व रसिकांनी भक्कम बळ दिले, तर पुन्हा कोकण प्रांतात खेडोपाडी झापांच्या थिएटरात रात्र रात्र प्रयोग रंगतील, असे देशपांडे म्हणाले.युवक - युवतीही उत्साहाने एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेऊन स्पर्धा उत्साहपूर्वक होतील. यातूनच नवीन कलाकार निर्माण होतील. यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न व्हायला हवेत. सध्या काहीशी ही चळवळ मंदावली असली तरी ती थांबणार नाही. असा विश्वास वाटतो, असे देशपांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.