शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या समाजातील स्त्रियांची अगतिकता दुर्लक्षित

By admin | Updated: August 20, 2014 00:27 IST

भटक्या विमुक्त समाजातील स्त्रियांचे जीवन लाचार आणि अगतिक आहे. या स्त्रियांची अगतिकता, असाह्यता मला अस्वस्थ करीत आली आहे.

पुणो : ‘‘भटक्या विमुक्त समाजातील स्त्रियांचे जीवन लाचार आणि अगतिक आहे. या स्त्रियांची अगतिकता, असाह्यता मला अस्वस्थ करीत आली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्यिक पातळीवर या स्त्रियांचे प्रश्न कधीच चर्चेत आले नाही,’’ अशी खंत विद्रोही स्त्री साहित्य-संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा, भटक्या विमुक्त स्त्री चळवळीच्या भाष्यकार विमल मोरे यांनी व्यक्त केले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र आयोजित पहिले विद्रोही स्त्री साहित्य-संस्कृती संमेलनाचे उद्घाटन जाती, वर्ग, स्त्री दास्याच्या बेडय़ा तोडून करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी कामगार नेत्या कॉ. मुक्ता मनोहर, स्त्रीवादी समीक्षक मीरा वेलायुधन, ऊर्मिला पवार, गझलकार डॉ. अजीज नदाफ, कॉ. साजूबाई गावित, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी उपस्थित होत्या.
मोरे म्हणाल्या, ‘‘भटक्या-विमुक्त जमातींमधील स्त्रियांना आत्मसन्मानाने, स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रय} करण्याची गरज आहे. राज्यव्यवस्था, शासनव्यस्था, त्याचबरोबर समाजाने पुढे येण्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले. भटक्या-विमुक्त जमातीमधील स्त्रियांच्या वाटय़ाला येणारं नरकप्राय जिणं स्थिर समाजाला अद्याप अपरिचित आहे. सामाजिक, राजकीय, स्त्रीमुक्तीच्या चळवळी, महिलांचे आरक्षण या स्त्रियांच्या हक्काविषयी कसलीही गंधवार्ता या समाजाला नाही. त्यांच्यामध्ये अशी जाणीव व्हावी, असा प्रय}ही होताना दिसत नाही.  अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा दारिद्रय़ाच्या गर्तेत अडकलेल्या या जमातीतील स्त्रियांना माणूस म्हणून स्थान कधी मिळेल, असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला. 
मुक्ता मनोहर म्हणाल्या, ‘‘भटक्या विमुक्त समाजाला शिक्षण देण्याची गरज आहे. स्त्रियांना संघटित करून, प्रबोधन करून विद्रोही क्षितिजे वाढवावी लागणार आहेत.’’ मीरा वेलायुधन, ऊर्मिला पवार, डॉ. हजीज नदाफ यांनीही मनोगते व्यक्त केली. 
प्रास्ताविक प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मेघना भोसले यांनी केले, तर डॉ. रेहना बेग यांनी आभार मानले. (प्रतिनिथी)
 
4भटक्या विमुक्त जमातीमधील लेखकांनी, आत्मकथनाच्या रूपाने आपापल्या जमातींचे जीवन रेखाटले आहे. त्यामधील स्त्रियांच्या प्रश्नाकडे, त्यांच्या अगतिक, असहाय जीवनाकडे गंभीरपणो पाहिले असल्याचे दिसून येत नाही. मी कसा घडत गेलो, याचेच प्रामुख्याने चित्रण झालेले दिसून येते. पुरुषप्रधान संस्कृती, जातपंचायत जोर्पयत समूळ नष्ट होणार नाही, तोर्पयत स्त्रियांचा विकास होणार नाही.