शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासाठी तिजोरी उघडण्याची गरज

By admin | Updated: September 2, 2015 23:40 IST

जयंत पाटील : कानडवाडीमध्ये विकासकामांचा प्रारंभ, महामंडळाकडून पाणी देण्याचा प्रयत्न

कुपवाड : राज्यावर सध्या दुष्काळाचे भयंकर सावट आहे. राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी सरकारने तिजोरी उघडी करणे गरजेचे आहे. मात्र, सरकार मोजूनमापून आवश्यक असेल तेथेच निधी खर्च करीत आहे. दुष्काळग्रस्तांसाठीच्या उपाययोजनाही हे शासन करताना दिसून येत नाही. त्यांना मदत करण्याची इच्छा शासनाकडे दिसून येत नसून, दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले जात आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केले. कानडवाडी (ता. मिरज) येथील विविध विकास कामांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, कानडवाडीचे नेते अनिल शेगुणसे प्रमुख उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, सध्या केंद्र शासनाची मानसिकता ही काळजीची बाब निर्माण झाली आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळावा, असे सरकारला वाटत नाही. दर पडल्याशिवाय महागाई कमी होत नाही, अशी धारणा या सरकारची आहे. कांद्याचा दर कमी होता, त्यावेळी शेतकऱ्यांनी मागणी करूनही विरोधी धोरण अवलंबले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याकडे पाठ फिरविली. कांद्याच्या किमती वाढल्यावर केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात केला. त्यामुळे कांद्याच्या किमती पडल्या. साखरेबाबतीतही केंद्र शासनाची हीच भूमिका आहे. त्यामुळे सरकार हे देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा परदेशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. यावेळी लिंबाजी पाटील, मनोज शिंदे, राजू माळी यांची भाषणे झाली. कानडवाडी गावातील विकास कामांसाठी सहकार्य करण्याची मागणी अनिल शेगुणसे यांनी केली. भालचंद्र खोत-गुरूजी यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, नगरसेवक विष्णू माने, संजय बजाज, उद्योजक भालचंद्र पाटील, राहुल पवार, शेडजी मोहिते, नानासाहेब लवटे, प्रकाश व्हनकडे, दिलीप तांबडे, सोसायटीचे अध्यक्ष शिवगोंडा कोथळे, सरपंच रुक्साना मुजावर, उपसरपंच शीतल भोरे, अनुपकुमार खोत, सुदर्शन हेरले आदी उपस्थित होते. (वार्ताहर) कानडवाडीकरांना दिलासाकानडवाडीसह सात गावांची पाणीपुरवठा योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे पत्रही कानडवाडी गावाला आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी कानडवाडी गावाला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या घोषणेमुळे कानडवाडीकरांना दिलासा मिळाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. कांद्याच्या किमती वाढल्यावर केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात केला. त्यामुळे कांद्याच्या किमती पडल्या. साखरेबाबतीतही केंद्र शासनाची हीच भूमिका असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.