शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Pawar : "आजचं राजकारण हे किळसवाणं, घृणास्पद, माणसाच्या जीवाची किंमत..."; रोहित पवारांची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:10 IST

NCP Rohit Pawar : रोहित पवार यांनी एक पोस्ट केली आहे. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून विरोधकांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावरून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. याच दरम्यान रोहित पवार यांनी एक पोस्ट केली आहे. 

"आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय... छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात राहावं का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही…!" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून होणाऱ्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी जर अशी काही चर्चा सुरू असती तर अजित पवारांनी भाजपाशी चर्चा केली असती असं विधान केले होते. आज बारामतीत झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांच्या या विधानावर शरद पवारांनी पलटवार केला. विलीनीकरणाच्या चर्चेत ते कुठेही नव्हते असा उल्लेख करत त्यांना बोलण्याचा काय अधिकार असाही प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला.

शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, राष्ट्रवादी विलीनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा काय अधिकार आहे हे मला समजले नाही. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याचा त्यांना काय अधिकार आहे मला माहिती नाही. आमचे सहकारी जयंत पाटील आणि अजित पवार हे विलीनीकरणावर चर्चा करत होते. सध्या विलीनीकरणावर राजकीय चर्चा नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला, त्यांना संधी दिली हा आनंद आहे. शपथविधीबाबत मला भाष्य करायचे नाही. अजितदादांच्या स्मारकाबाबत मला माहिती नाही. मी ते पेपरमध्ये वाचले. परंतु मला काही कल्पना नाही. ज्या संस्थेच्या जागेची चर्चा लोकांनी केली आहे. त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. त्यामुळे मला ठाऊक असले पाहिजे. अद्याप त्याबाबत आम्ही चर्चाही केली नाही. आम्ही संस्थेचे सर्व एकत्रित बसून त्यावर चर्चा करू. त्यामुळे आज अजित पवारांच्या स्मारकावर भाष्य करणे योग्य नाही असं शरद पवारांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Pawar slams today's disgusting politics, questions human value.

Web Summary : Rohit Pawar criticizes the current state of politics, deeming it repulsive and devoid of human value. Discussions arise about NCP unification after Ajit Pawar's death, with claims and counterclaims exchanged between leaders. Sharad Pawar refuted Fadnavis's claims on merger talks.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार