शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीधर्माला राष्ट्रवादीचा खो

By admin | Updated: August 20, 2014 00:45 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सर्व 288 मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती 25 ऑगस्टपासून सुरू करण्याचे ठरविले आहे.

मुंबई : काँग्रेसने 2क्क्9च्या निवडणुकीत लढविलेल्या 174 विधानसभा मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती सुरू केलेल्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सर्व 288 मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती 25 ऑगस्टपासून सुरू करण्याचे ठरविले आहे. 
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाच्या सांसदीय मंडळाच्या उपस्थितीत या मुलाखती येथील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात होतील. पक्षाने 11 ते 2क् ऑगस्टदरम्यान सर्व 288 मतदारसंघांमधील इच्छुकांचे अर्ज मागविले होते. काँग्रेसनेही 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागविले पण मुलाखती केवळ आपल्या वाटय़ाच्या 174 मतदारसंघांसाठीच घेतल्या. जागावाटपात काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी राष्ट्रवादीने ही खेळी केल्याचे  म्हटले जात आहे. 
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपासाठी आजपासून दिल्लीत बैठकी सुरू होणार होत्या पण तसे होऊ शकले नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपलब्ध नसल्याने चर्चा होऊ शकली नसल्याचे सांगितले जात आहे. तथापि, आधी राज्यात आणि नंतर दिल्लीत चर्चा व्हावी, असा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांनी धरल्याची माहिती आहे. 
राष्ट्रवादीतर्फे 25 ऑगस्टला ठाणो, पालघर, रायगड, र}ागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांसाठी मुलाखती होतील. 26 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील मुलाखती होतील. 27 ऑगस्टला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)