शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

'तुम्ही खरंच एकटं लढणार का, ठरलं असेल तर स्पष्ट सांगा !'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 5:34 AM

Sharad Pawar : शरद पवार यांचा काँग्रेसच्या नेत्यांना थेट सवाल. नाना पटोले बैछकीला अनुपस्थितीत.

ठळक मुद्देशरद पवार यांचा काँग्रेसच्या नेत्यांना थेट सवाल.नाना पटोले बैछकीला अनुपस्थितीत.

अतुल कुलकर्णी

मुंबई : तुम्ही खरंच सगळ्या निवडणुका एकटेच लढणार आहात का? तुमचा निर्णय झाला असेल तर तसे स्पष्ट सांगा, या शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपली नाराजी काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केल्याचे समजते. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

गेल्या काही दिवसापासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेला गदारोळ आणि त्यातून महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पक्ष वाढवण्याच्या भाषेविषयी आपल्या मनात कुठलीही शंका नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तो वाढलादेखील पाहिजे. मात्र, ज्या पक्षांसोबत आपण सत्तेत आहोत ते पक्ष दुखावले जाणार नाहीत, सरकारमध्ये कटुता येणार नाही, अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात, अशा शब्दात पवार यांनी स्पष्टपणे स्वतःचे मत सांगितल्याचे वृत्त आहे.

पुढच्या सगळ्या निवडणुका एकट्याने लढण्याचा तुमचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असेल तर मला त्याविषयी काहीच बोलायचे नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना आपण यासंबंधीचे अधिकार दिले आहेत का? दिले असतील तर तसेही सांगा, म्हणजे आम्ही तुमच्या वक्तव्याकडे लक्ष देणार नाही, असेही पवार यांनी ऐकवले. 

आम्ही तिघेही अनेक वर्षे राजकारणात आहोत. अवास्तव न बोलण्याच्या मताचे आम्ही आहोत, अशी भावना एच. के. पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली. आरबीआय आणि केंद्रीय वित्त विभागाकडून सहकारी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांबाबत जारी करण्यात आलेले वेगवेगळे निर्णय, बदलण्यात आलेले नियम व त्यामुळे सहकारी वित्त पुरवठा  क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांसमोर निर्माण झालेल्या अडचणी यांबाबत देखील पवार यांनी स्वत:ची मते सांगितली.देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन, त्याअनुषंगाने राज्य सहकारी कायद्यात केलेले बदल, राज्यातील राजकीय परिस्थिती, येऊ घातलेल्या विविध निवडणुका, यावर या बैठकीत चर्चा झाली.

डाटा लवकर गोळा करण्याच्या सूचनामराठा आरक्षणाच्या संदर्भात दिल्लीत काय घडले यावर देखील बैठकीत चर्चा झाली. अशोक चव्हाण यांनी याविषयीची विस्तृत माहिती पवार यांना दिली. सर्वोच्च न्यायालयात गायकवाड कमिशनचा जो डाटा देण्यात आला होता, तो पुरेसा नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. त्यामुळे नवीन आयोगाकडून लवकरात लवकर डाटा गोळा करावा, अशी सूचनाही शरद पवार यांनी केली. ओबीसी समाजाच्या एम्पिरिकल डाटाबद्दल देखील यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पटोले अनुपस्थितकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना या बैठकीला येण्याची इच्छा होती. मात्र, आम्ही शरद पवार यांना तीनच नावे कळवली आहेत, असे उत्तर प्रभारी एच. के. पाटील यांनी दिल्यामुळे पटोले यांना जाता आले नाही, असेही सांगण्यात आले.

विधानसभा अध्यक्षाचे नाव तुम्ही ठरवाविधानसभेच्या अध्यक्षपदासंबंधी यावेळी चर्चा झाली. हे पद काँग्रेसला दिले होते. त्यात कसलाही बदल होणार नाही. तुम्ही कोणाचेही नाव ठरवा, आमचा त्याला विरोध असणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. महामंडळांच्या नेमणुका लवकर करता येतील तेवढे बरे होईल, अशी मागणी पाटील यांनी पवार यांच्याकडे केली. देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन, त्याअनुषंगाने राज्य सहकारी कायद्यात केलेले बदल यावर या बैठकीत चर्चा झाली.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूकNana Patoleनाना पटोलेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAshok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षण