Sharad Pawar : आता विषय निघालाच आहे तर...; मावळवरून शरद पवारांचं फडणवीसांना ९० हजारी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 03:54 PM2021-10-13T15:54:13+5:302021-10-13T18:03:10+5:30

मावळची तुलता लखीमपूर हिंसाचाराशी करणाऱ्या Devendra Fadnavis फडणवीसांना Sharad Pawar शरद पवारांचं उत्तर

ncp chief sharad pawar hits back at bjp leader devendra fadnavis over maval firing | Sharad Pawar : आता विषय निघालाच आहे तर...; मावळवरून शरद पवारांचं फडणवीसांना ९० हजारी उत्तर

Sharad Pawar : आता विषय निघालाच आहे तर...; मावळवरून शरद पवारांचं फडणवीसांना ९० हजारी उत्तर

Next

मुंबई: लखीमपूरमधील हिंसाचारावरून देशातील वातावरण तापलं आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारनं चिरडल्याचा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलावर आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं आहे. लखीमपूरमधील हिंसाचाराची तुलना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी Sharad Pawar जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी पवारांना काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना घडलेल्या मावळ गोळीबाराची आठवण करून दिली. यानंतर आता पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

देवेंद्र फडणवीसांनी लखीमपूरवर बोलताना मावळचं प्रकरण काढलं. त्यांनी तो विषय काढला हे बरंच झालं, असं शरद पवार म्हणाले. 'मावळमध्ये तेव्हा नेमकं काय घडलं, ते अनेकांच्या त्यावेळी लक्षात आलं नाही. त्या कारवाईत शेतकरी मृत्यूमुखी पडले ही गोष्ट खरी आहे. मात्र त्याला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते, मंत्री जबाबदार नव्हते. ती कारवाई पोलिसांची होती. आता मावळचं चित्र स्पष्ट झालं आहे. तिथली परिस्थिती हाताबाहेर जावी यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी प्रोत्साहित केलं, असा दावा पवारांनी केला.
 
मावळमधलं सत्य समोर आल्यानंतर लोकांचा गैरसमज दूर झाला. त्यानंतर तिथली परिस्थिती बदलली. काही अपवाद वगळता मावळ विधानसभा मतदारसंघात कायम जनसंघ आणि भाजपचं वर्चस्व राहिलं. रामभाऊ म्हाळगी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व विधानसभेत केलं. मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांबद्दल तिथे संताप निर्माण झाला. पण माथी भडकावण्याचं काम कोणी केलं हे लोकांच्या लक्षात आल्यावर चित्र बदललं. २०१९ मध्ये तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार तब्बल ९० हजार मतांनी निवडून आला, असं पवार यांनी सांगितलं.
 
फडणवीसांचं कौतुक अन् अभिनंदन
गेल्या दोन वर्षांत लोकांचं खूप प्रेम मिळालं. त्यामुळे मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच म्हटलं. फडणवीसांच्या या विधानावरून शरद पवारांनी पत्रकार परिषदेत टोलेबाजी केली. विरोधी पक्षनेत्यांना ते आजही मुख्यमंत्री आहेत असं वाटतात. त्यांचं कौतुक वाटतं. त्यांचं मी अभिनंदन करतो, असा चिमटा शरद पवारांनी काढला.

फडणवीसांना अद्यापही ते मुख्यमंत्री आहेत असं वाटतं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. याबाबतीत मी थोडा कमी पडतो. चारवेळा मुख्यमंत्री राहूनही मला फडणवीसांसारखं वाटत नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे अशी भावना माझ्या मनात निर्माण होत नाही. फडणवीसांना ते मुख्यमंत्री आहेत असं वाटतं. मी पुन्हा येईनची त्यांची जखम किती सखोल आहे हे त्यातून दिसतं, असा टोला पवारांनी लगावला.

Web Title: ncp chief sharad pawar hits back at bjp leader devendra fadnavis over maval firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.