शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग होणार ग्रीन हायवे - गडकरी

By admin | Updated: September 29, 2015 02:55 IST

देशभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार असून यातून ५ लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच बीपीटी आणि जेएनपीटीच्या

मुंबई : देशभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार असून यातून ५ लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच बीपीटी आणि जेएनपीटीच्या माध्यमातून २०० मेगावॅट वीज तयार केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांना दिली.राष्ट्रीय महामार्गासाठी दीड लाख किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याचे लक्ष्य असून महामार्गाच्या दुतर्फा झाडी आणि मधोमध रंगीत फुलांचे ताटवे असावेत यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नरेगाच्या माध्यमातून नर्सरींची उभारणी करण्यासाठी मदत केली जाणार असून त्यातून बेरोजगार युवकांना काम मिळेल. झाडे लावण्याचे व जगवण्याचे काम स्वयंसेवी संस्था, तरुण बेरोजगारांना देण्यात येणार असून झाडांना नंबर लावलेले असतील. त्यासाठी गुगल आणि अंतराळ वैज्ञानिकांची मदत घेतली जाईल. ग्रीन हायवेच्या माध्यमातून देशात हिरवेगार रस्ते उभे राहतील, असेही गडकरी म्हणाले.येत्या तीन महिन्यात या कामाचा शुभारंभ होईल. झाडे लावताना झाडांच्या दुतर्फा कुंभाराकडून बनविण्यात येणारे दोन माठ ठेवले जातील, त्यात पाणी भरले जाईल जे झिरपून झाडांना मिळेल. यातून कुंभारांनाही काम मिळेल. याआधी झाडे लावण्याचे काम रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांना दिले जात होते, यापुढे ते काम एनजीओ आणि सुशिक्षीत तरुणांकडून करुन घेतले जाईल. काही हायवेच्या भोवतीची जागा सरकार ताब्यात घेणार असून त्याठिकाणी ट्रक टर्मिनन्स, स्वच्छता गृहे, ढाबे यांची उभारणी केली जाईल. शिवाय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आजुबाजूच्या गावातील हस्तकलेच्या वस्तू, खाद्यपदार्थ यांचे स्टॉल ठेवले जातील. काही महत्वाच्या महामार्गांवर हेलीपॅडदेखील उभारले जाणार आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)