शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये ३६ तासांत ५८.६ मि.मी पाऊस

By admin | Updated: July 3, 2016 19:28 IST

गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईच्या सावटाखाली वावरणाऱ्या नाशिककरांवर शनिवारी (दि.२) मध्यरात्री वरुणराजाची अखेर कृपादृष्टी झाली. रविवारी सकाळपासून पावसाची शहरासह उपनगरांमध्ये संततधार सुरू

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. ३  : गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईच्या सावटाखाली वावरणाऱ्या नाशिककरांवर शनिवारी (दि.२) मध्यरात्री वरुणराजाची अखेर कृपादृष्टी झाली. रविवारी सकाळपासून पावसाची शहरासह उपनगरांमध्ये संततधार सुरू होती. सायंकाळपर्यंत शहरात ४३.४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद हवामान खात्याने केली तर ३६ तासांत शहरात ५८.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.जूनच्या उत्तरार्धात मुंबईत मान्सून दाखल होताच नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या. पावसाच्या बहुप्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना चिंब भिजण्याची लागलेली ओढ अधिक वाढली; मात्र आकाशात नुसतीच ढगांची गर्दी होत होती आणि दाटलेले नभ नाशिककरांना दररोज हुलकावणी देत होते. पाण्याच्या प्रतीक्षा सर्वसामान्यांपासून तर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी अन् पालिकेच्या राज्यकर्त्यांनाही होती. पावसाची जोरदार हजेरी अनुभवण्यासाठी नाशिककर आतुर झाले असताना गोदामाईलाही पावसाची तेवढीच प्रतीक्षा होती. गोदावरीचे कोरडेठाक पात्र बघण्याची दुर्दैवी वेळ नाशिककरांवर यंदा आली होती. शनिवारी मध्यरात्री पावसाने दमदार सलामी दिली. रविवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत पावसाने शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. दीड ते दोन तासांची विश्रांती घेत पुन्हा पावसाला सुरुवात झाली अन् दिवसभर संततधार सुरूच होती. शहरासह उपनगरांमधील रस्ते जलमय झाले होते. गोदापात्राबरोबरच नासर्डीच्या पात्रातही पाण्याचा प्रवाह वाढला आणि नाशिककरांची मने सुखावली. मागील अनेक दिवसांपासून कोरडेठाक नदीपात्र बघणाऱ्या नाशिकरांना प्रवाहित पात्रामुळे झालेल्या आनंदापुढे आकाश ठेंगणे झाले होते. सकाळी अकरा वाजेपासूनच गोदापात्राच्या पुलांवर येऊन अबालवृद्धांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. टॅँकरने रामकुंड भरण्याची दुर्दैवी वेळ महापालिकेवर यावर्षी ओढावली होती. वरुणराजाच्या कृपेने नैसर्गिकरीत्या रामकुंड खळाळून प्रवाहित झाल्याचे समाधानकारक चित्र रविवारी सकाळी बघावयास मिळाले.