Nagar Panchayat Election Results 2022 LIVE : राज्यातील नगरपंचायतींवर कोणाची सत्ता? कुणी किती जागा जिंकल्या? वाचा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 11:00 AM2022-01-19T11:00:26+5:302022-01-19T16:01:19+5:30

Nagar Panchayat Election Results 2022 LIVE: या निकालाने कोणत्या नगरपंचायतीत सत्तांतर होते व कोठे सत्ता कायम राहते हे जाणून घेण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Nashik Jalgaon Ahmednagar Jalna Chandrapur Amravati Nagar Panchayat Election Result 2022 | Nagar Panchayat Election Results 2022 LIVE : राज्यातील नगरपंचायतींवर कोणाची सत्ता? कुणी किती जागा जिंकल्या? वाचा एका क्लिकवर

Nagar Panchayat Election Results 2022 LIVE : राज्यातील नगरपंचायतींवर कोणाची सत्ता? कुणी किती जागा जिंकल्या? वाचा एका क्लिकवर

Next

मुंबई : राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची (Maharashtra Local Body Election Result) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. इतर मागासवर्गीयांचे आरक्षण (ओबीसी) रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील 32 जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये 413 जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर निकाल हाती आले आहेत.  106 पैकी 97 नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. तर 9 नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत.  दरम्यान, निवडणुकीतील या निकालाने कोणत्या नगरपंचायतीत सत्तांतर होते व कोठे सत्ता कायम राहते हे जाणून घेण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आतापर्यंत कुणी किती जागा जिंकल्या?
आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीला सर्वाधिक 25 नगरपंचायती आणि 278 जागा तर भाजपला 24 नगरपंचायती आणि 416 जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला 18 नगरपंचायती, 297 जागा तर शिवसेनेला 14 नगरपंचायती, 301 जागा मिळाल्या आहेत. 

>> गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांना धक्का
गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांना धक्का बसला असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांचा पराभव झाला आहे. डवा जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर पराभूत झाले आहेत. भाजपाचे बी एम पटले विजयी झाले आहेत.

>> भंडारा जिल्हा परिषद 52 जागा
भाजप :  ९
शिवसेना :  ००
राष्ट्रवादी   : ५
काँग्रेस :   ७
इतर :   ०२
२३ गटांचा निकाल घोषित.

>> रायगड जिल्हा - खालापूर नगर पंचायत निवडणूक
निकाल जाहीर जागा - 17
सेना - 8
शेकाप - 7
राष्ट्रवादी - 2

... याचा अर्थ भाजपला लोकांनी नाकारले आहे - नवाब मलिक
राज्यातील विविध नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा मिळाल्या आहेत, याचा अर्थ भाजपला जनतेने नाकारले आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. आज राज्यातील नगरपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून यावरून नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

>> सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला 4 नगरपंचायतीमध्ये यश, शंभूराज देसाईंचं पॅनेल पराभूत

>> देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा एकहाती विजय

>> कर्जत नगरपंचायतीमधील विजयानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया...

>> मुरबाड नगरपंचायत अपडेट
मुरबाड नगरपंचायतीवर अखेर भाजपचाच झेंडा. आमदार किसन कथोरे यांचा करिश्मा. १७ पैकी १० जागा मिळवत भाजपची मुरबाड नगरपंचायतीवर एकहाती सत्ता तर शिवसेनेनं ५ जागा आणि अपक्षांनी जिंकल्या २ जागा, इतर पक्षांना मात्र खातं उघडण्यातही यश आले नाही.
- पक्षनिहाय विजयी उमेदवार
भाजप
मानसी देसले - प्रभाग २ 
राम दुधाळे - प्रभाग ३
नम्रता जाधव - प्रभाग ४
उर्मिला ठाकरे - प्रभाग ८
राव रविना विनायक - प्रभाग ९
मुकेश विशे - प्रभाग ११
मोहन गडगे - प्रभाग १२
संतोष चौधरी - प्रभाग १३
मधुरा सासे - प्रभाग १५
स्नेहा भोईर - प्रभाग १६

शिवसेना
विनोद नार्वेकर - प्रभाग ५
नम्रता तेलवणे - प्रभाग ६
अक्षय रोटे - प्रभाग ७
मोनिका शेळके - प्रभाग १०
नितीन तेलवणे - प्रभाग १४

अपक्ष
दिक्षिता वारे - प्रभाग १
अनिता दुधाळे - प्रभाग १७

>> कोरेगाव नगरपंचायतीत शहर विकास परिवर्तन पॅनेलला एकहाती सत्ता, अनेक दिग्गजांना बसला पराभवाचा धक्का 

>> मोहाडी नगरपंचायत
भाजप   -     9
राष्ट्रवादी  -    6
कांग्रेस   -     2
भाजपला स्पष्ट बहुमत

>> भंडारा जिल्हा परिषद 52 जागा
भाजप :  5
शिवसेना :  0
राष्ट्रवादी   : 4
काँग्रेस :   5
इतर :   2
16 गटांचा निकाल घोषित.

>> भंडारा : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे लाखांदूर तालुक्यातील भागडी गटातून पराभूत. भाजपचे प्रियंक बोरकर विजयी.

>> नाशिक जिल्हा नगरपंचायत निकाल

कळवण (एकूण जागा : १७)
महाविकास आघाडी १४
भाजपा
मनसे १

दिंडोरी (एकूण जागा १७)
शिवसेना ६
भाजप ४
राष्ट्रवादी ५
काँग्रेस २

पेठ ((एकूण जागा १७)
राष्ट्रवादी ८
शिवसेना ४
माकप ३
भाजप १
अपक्ष १

सुरगाणा (एकूण जागा १७)
भाजप ८
शिवसेना ६
माकप २
राष्ट्रवादी १

निफाड (एकूण जागा १७)
निफाड शहर विकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना,बसपा) : १४
राष्ट्रवादी काँग्रेस

देवळा (एकूण जागा १७)
भाजपा १५
राष्ट्रवादी २

>> बोदवडमध्ये खडसेंना धक्का, नगरपंचायतीत शिवसेनेला बहुमत
बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. १७ पैकी नऊ जागा जिंकत  शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादीला सहा तर भाजपला फक्त एक जागा मिळाली आहे.

>> जळगाव : बोदवड नगरपंचायत निवडणुकीत एकनाथ खडसे यांना मोठा धक्का. जिल्हा परिषदेच्या माजी  सदस्या  रेखा कैलास चौधरी यांचा  पराभव. प्रभाग क्र.१०,  क्र ११ व क्र १२मधून शिवसेनेच्या अनुक्रमे मनीषा कैलास बडगुजर, बेबी रमेश भोई व शारदा बोरसे विजयी.

>> अहमदनगर: अकोले नगरपंचायतीवर  भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व. माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिंकल्या 12 जागा

>> नाशिक जिल्हा : पेठ नगर पंचायत निकाल
1 ) रामदास गायकवाड (राष्ट्रवादी) 
2)मनोज घोंगे ( शिवसेना)
3)प्रकाश धुळे ( शिवसेना )
4 ) युवराज लिमले (राष्ट्रवादी )
5 ) लता सातपुते (शिवसेना )
6 )छाया हलकंदर ( राष्ट्रवादी )
7 ) विजय पंडित धूम ( राष्ट्रवादी )
8 ) गणेश गावित ( अपक्ष )
9 )रामेश्वरी वहवारे ( राष्ट्रवादी )
10 ) अफरोजा शेख ( माकप )
11 )लता गायकवाड ( भाजप )
12 ) सरिता हाडळ ( राष्ट्रवादी )
13 )हेमलता वळवी ( माकप )
14 ) राहुल चोथावे ( माकप )
15 ) करण करवंदे ( राष्ट्रवादी )
16 ) अलका कस्तुरे ( राष्ट्रवादी )
17 ) शीतल राहणे ( शिवसेना )

राष्ट्रवादी 8  शिवसेना 4  माकपा 3 भाजपा 1  अपक्ष 1

>> जालन्यात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व
जालना :  जिल्ह्यातील पाचही नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहे. बदनापूरमध्ये महाविकास आघाडीचा पराभव करून भाजपने ९ जागांवर विजय मिळविला आहे. तर घनसावंगी, तीर्थपुरी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय संपादित केला असून, मंठ्यात शिवसेनेने पुन्हा बाजी मारली आहे. जाफराबादमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आठ सदस्य आणि कॉंग्रेसचे तीन सदस्य विजयी झाले आहेत.

>> पालम नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा 17 पैकी 10 जागेवर राष्ट्रवादीचा विजय
पालम ( परभणी ) ः आजी व माजी आमदारांसह गणेशराव रोकडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या पालम नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले. त्यांनी 17 पैकी 10 जागांवर दणदनीत विजय मिळवीत भाजपकडून सत्ता खेचून आणली. तर उर्वरीतमध्ये रासप 4 आणि पुरस्कृत 1 तर भाजपला 1 आणि पुरस्कृत 1 जाग्यावर समाधान मानावे लागले.

>> लातूर जिल्ह्यातील चार नगरपंचायत निवडणूक निकाल जाहीर
लातूर : जिल्ह्यातील चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर अनंतपाळ नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी बुधवारी पार पडली. 
यामध्ये चाकूरनगरपंचायत 17 जागांपैकी  महाविकास आघाडीला 8, प्रहारला 6 तर भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत.
शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप 9, राष्ट्रवादी 4, शिवसेना 3 आणि एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.
जळकोट नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस 7, राष्ट्रवादी 4, शिवसेना 2, भाजपा 1 आणि अपक्ष 3 विजयी झाले आहेत.
देवणी नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस 12, राष्ट्रवादी 2, अपक्ष 2, भाजप 1 जागांवर विजयी झाले आहेत.

>> जळगाव : बोदवड नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. पाचमध्ये ईश्वर चिठ्ठीत भाजपचे विजय बडगुजर विजयी.

>> नंदूरबार : धडगाव नगर पंचायत एकूण जागा - 17
शिवसेना - 13 विजयी
काँग्रेस - 03 विजयी
भाजपा - 01 विजयी
पालकमंत्री के सी पाडवी यांना मतदार संघातच धक्का, काँग्रेसला अवघ्या तीन जागा, शिवसेनेची सरसी.

>> वाशिम  : मानोरा नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी, 17 पैकी 14 जागा जिंकल्या.

>> सातारा : लोणंद नगरपंचायत
१० राष्ट्रवादी विजयी,
३ भाजप विजयी,
३ कॉग्रेस विजयी,
१ अपक्ष विजयी.
नगरपंचायतीवर आ मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा झेंडा

खंडाळा नगरपंचायत
राष्ट्रवादी १०
भाजपा ७

>> वाशिम  : मानोरा नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी, 17  पैकी 14 जागा जिंकल्या

>> भंडारा : जिल्हा परिषदेच्या मोहाडी तालुक्यातील कांद्री गटातून राष्ट्रवादीच्या  अनिता नलगोकुलवार विजयी.

>> सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील चार नगरपंचायतपैकी वैभववाडी व दोडामार्गमध्ये भाजपचा एकतर्फी विजय. देवगडमध्ये महाविकास आघाडी तर कुडाळमध्ये त्रिशंकू परिस्थिती.

>> रायगड जिल्हा - तळा नगरपंचायतीच्या 17 जागेपैकी 10 राष्ट्रवादी, 4 शिवसेना, 3 भाजप

>> अहमदनगर : पारनेर नगरपंचायत
(17 पैकी)
राष्ट्रवादी -7
शिवसेना -6
अपक्ष- 1
शहर आघाडी -2
भाजप - 1

>> नाशिक -  3 नगरपंचायत निवडणूक निकाल घोषित 
3 पैकी 2 ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी सेनेचं वर्चस्व

सुरगाणा नगरपंचायत
एकूण जागा - 17 
शिवसेना - 06
भाजप - 08
माकप - 02
राष्ट्रवादी काँग्रेस - 01 

देवळा नगरपंचायत
एकूण जागा - 17 
भाजप - 15
राष्ट्रवादीला - 2 

निफाड नगरपंचायत
एकूण जागा - 17 
शिवसेना- 07
राष्ट्रवादी काँग्रेस- 03
काँग्रेस - 01
शहर विकास आघाडी - 04
बसपा- 01
इतर(अपक्ष)-01

जळगाव : बोदवड नगरपंचायत निकाल अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेस 3
शिवसेना 2 
भाजप 1 (ईश्वर चिठ्ठी)

>> सांगली : खानापूर नगरपंचायत
काँग्रेस-शिवसेना - ९ जागा
जनता आघाडी - ८ जागा

>> लातूर : जळकोट नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस 7, राष्ट्रवादी 4, शिवसेना 2, भाजपा 1 आणि अपक्ष 3 विजयी.

>> सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग 16 अ पोटनिवडणुकीचा निकाल,
महेंद्र चंडाळे (शिवसेना)- 535
अमोल गवळी (भाजप)- 3434
सुरेश सावंत (अपक्ष) - 587
तौफिक शिकलगार (काँग्रेस) - 7429
उमरफारूक ककमरी (वंचित आघाडी) : 21
समीर सय्यद (अपक्ष) -18
काँग्रेसचे तौफिक शिकलगार 3995 मतांनी विजयी

>> भंडारा : जिल्हा परिषदेच्या भंडारा तालुक्यातील कोथुर्णा गटातून काँग्रसच्या गायत्री प्यारेलाल वाघमारे विजयी. 4063 मते मिळाली.

>> रत्नागिरी : दापोलीत मतदारांनी योगेश कदम यांचे बंड नाकारले तर मंडणगडमध्ये बंडखोरांकडून शिवसेनेला धोबीपछाड.

>> अहमदनगर:  पारनेर नगरपंचायत
(17 पैकी)
राष्ट्रवादी -7
शिवसेना -6
अपक्ष- 1
शहर आघाडी -2
भाजप - 1

>>सांगली : कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीची मुसंडी. राष्ट्रवादी 10, आघाडी 6, अपक्ष 1. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचा करिश्मा.

>> देवगड : भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा शिरकाव आठ जागा पटकावल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस ला एक तर भाजपला आठ जागा
 संदेश पारकर यांनी एक हाती बालेकिल्ल्याच्या नेतृत्व करत आमदार नितेश राणे यांना धक्का दिला

>>लातूर : शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप 9, राष्ट्रवादी 4, शिवसेना 3 आणि एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी.

>> नागपूर जिल्हा :  हिंगणा नगरपंचायत निवडणूक निकाल
मागील वेळेस शेवटच्या अडीच वर्षात भाजपचे वर्चस्व असलेल्या हिंगणा नगरपंचायत मध्ये भाजपने 9 जागा जिंकून बहुमत मिळविले आहे.
भाजप आमदार समीर मेघे यांचे वर्चस्व कायम, माजी मंत्री रमेश बंग यांना धक्का, काँग्रेसचे स्वबळ फसले. 
एकूण जागा :  17 
भाजप :  9
राष्ट्रवादी :  5
शिवसेना - 1
अपक्ष  - 2

>> लातूर : चाकूर नगरपंचायतीच्या 17 जागेसाठी बुधवारी मतमोजणी झाली. यामध्ये महाविकास आघाडीला 8, प्रहारला 6 तर भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत.

>> धुळे - साक्री नगरपंचायत निवडणुकीत सत्तांतर भाजप 11 जागा मिळवून सतेत. तर शिवसेना चार, अपक्ष एक आणि कॉंग्रेसला एक जागा मिळाली.

>> सिंधुदुर्ग : देवगड नगरपंचायत महाविकास आघाडीकडे, भाजपासह नितेश राणेंना धक्का.

>> नाशिक : निफाड नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडी,शिवसेना कॉग्रेस बसपाची सत्ता 17 पैकी 14 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी कॉग्रेसला अवघ्या 3 जागा

>> नाशिक : नगरपंचायत निवडणूक : सुरगाणा - 17   जागा निकाल जाहीर
शिवसेना - 6
भाजप - 8
माकप - 2
राष्ट्रवादी - 1

>> रायगड जिल्हा - म्हसळा - 17 पैकी एक बिनविरोध - 16 पैकी - राष्ट्रवादी 10, काँग्रेस 8

>> नाशिक : नगरपंचायतीचे नाव-निफाड
एकुण जागा-17
भाजप-
शिवसेना- 07
काँग्रेस-01
राष्ट्रवादी-01
शहर विकास आघाडी - 01
बसपा- 01
इतर(अपक्ष)-01

>> नाशिक : नगरपंचायत निवडणूक : सुरगाणा - 17   जागा निकाल जाहीर 
शिवसेना - ६
भाजप - ०८
माकप - ०२
राष्ट्रवादी - 1

>> भंडारा : जिल्हा परिषदेच्या तुमसर तालुक्यातील आष्टी गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार राजू देशभ्रतार विजयी. राष्ट्रवादीने खाते उघडले.

>> नगरपंचायतीचे नाव - दिंडोरी
एकुण जागा - 17
भाजप - 4
शिवसेना - 6
(शिवसेनेची 1 जागा अगोदर बिनविरोध झाली होती)
काँग्रेस - 2
राष्ट्रवादी - 5
इतर(अपक्ष) - 00
(शिवसेनेच्या सर्वाधिक 6 जागा निवडून आल्या आहेत)

>> बुलडाण्याच्या संग्रामपुरात बच्चू कडूंची सरशी, 12 जागांवर डंका

>>अहमदनगर : कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात. आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा लागली होती पणाला कार्यकर्त्यांचा जल्लोष

>> सोलापूर : वैराग नगरपालिका निकाल; 12  पैकी 10 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2 भाजप- दिलीप गांधी यांचा पराभव.

>>सिंधुदुर्ग : वैभववाडी नगरपंचायत 8 पैकी 4 भाजप, 2 शिवसेना 2 अपक्ष.

>> लातूर : जळकोट नगरपंचायत 17 जागांपैकी 12 जागांचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये काँग्रेस 5, राष्ट्रवादी काँग्रेस 2, शिवसेना 1, भाजप 1, अपक्ष 3 जागांवर निवडून आले आहेत. तर 5 जागांची मतमोजणी सुरू आहे.

>> मोखाडा नगरपंचायत आघाडी 5 शिवसेना 7 आणि भाजप 2 जिजाऊ 2.

>> सोलापूर : माळशिरस नगरपालिका निवडणूक निकाल; भाजप दहा, अपक्ष तीन तर महाविकास आघाडीला दोन जागेवर मिळाला विजय.

>> कुडाळ-भाजप 8 , शिवसेना 7 व काँग्रेस 02; काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेत.

Web Title: Nashik Jalgaon Ahmednagar Jalna Chandrapur Amravati Nagar Panchayat Election Result 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app