Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: "आता माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही;" विजयानंतर आर.आर.पाटलांच्या मुलाचं विरोधकांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 11:30 AM2022-01-19T11:30:40+5:302022-01-19T11:31:17+5:30

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: कवठेमहांकाळ नगरपरिषद राष्ट्रवादीकडे. आर.आर.पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांचा विजय.

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE r r patil son rohit patil won elections rembereds father | Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: "आता माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही;" विजयानंतर आर.आर.पाटलांच्या मुलाचं विरोधकांना प्रत्युत्तर

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: "आता माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही;" विजयानंतर आर.आर.पाटलांच्या मुलाचं विरोधकांना प्रत्युत्तर

googlenewsNext

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. कवठेमहांकाळ नगरपंचायत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result) राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा कवठेमहांकाळ नगरपंचायतीत विजय झाला असून रोहित पाटील यांनाही विजय मिळाला आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलला १०, तर शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर विजय मिळाला. तर एका जागी अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. 

मतदानापूर्वी रोहित पाटील यांनी केलेल्या भाषणातील वक्तव्याची सर्वच ठिकाणी चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेची सांगता रोहित पाटील यांच्याच भाषणानं झालं होती. यावेळी त्यांनी आपले वडील आर. आर. पाटील यांची आठवण काढली होती. "आमच्या मनातील पॅनल निवडलंय असं सर्वसामान्यांचं मत आहे. सर्वसामान्य माणसानं राष्ट्रवादीला खांद्यावर घेतलंय. त्यांनी पक्षाची जबाबदारी घेतलीये. या निवडणुकीचा निकाल १९ जानेवारीला जाहीर होईस. निकाल लागल्यानंतर माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही," असं ते म्हणाले होते. 

रोहित पाटलांनी दिली प्रतिक्रिया
"निवडणुकीच विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं होतं. माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही," अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी विजयानंतर दिली.

Web Title: Nagar Panchayat Election Result 2022 LIVE r r patil son rohit patil won elections rembereds father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.