Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: कर्जत नगरपंचायतीत रोहित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची बाजी, एकहाती सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:10 PM2022-01-19T12:10:27+5:302022-01-19T12:10:49+5:30

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: कर्जत नगरपंचायतीत रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर होती. 

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE NCP wins Karjat Nagar Panchayat under the leadership of Rohit Pawar bjp ram shinde | Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: कर्जत नगरपंचायतीत रोहित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची बाजी, एकहाती सत्ता

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: कर्जत नगरपंचायतीत रोहित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची बाजी, एकहाती सत्ता

googlenewsNext

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवत नगरपरिषदेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं १२, काँग्रेसनं ३ तर भाजपनं केवळ २ जागांवर विजय मिळवला.

ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे १३ जागांवर २२ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर उर्वरित ४ जागांसाठी १८ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आलं. तर दुसरीकडे यापूर्वीच्या १३ जागांपैकी एका जागेवर भाजपच्या एका उमेदवारानं अखेरच्या क्षणी आपला अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे ती जागा बिनविरोध झाली होती. तर भाजपच्या एका उमेदवारानं राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा दिला होता. त्यामुळे ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. परंतु अखेर या निवडणुकीत रोहित पवारांनी बाजी मारली आणि या नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली.

Web Title: Nagar Panchayat Election Result 2022 LIVE NCP wins Karjat Nagar Panchayat under the leadership of Rohit Pawar bjp ram shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.